'हा' शेअर हिरा आहे हिरा; आताच घेऊन ठेवा, 'हिरा' नाही पण नफ्यानंतर सोनं नक्कीच घ्याल ?

Share Market
Share MarketSakal
Updated on

आधी भारत अर्थ मूव्हरच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या BEML च्या दरात एका वर्षात 100 टक्के पेक्षा जास्त वाढ बघायला मिळाली. या काळात निफ्टी मध्ये 55 टक्के रॅली बघायला मिळाली. याहीवर्षी या शेअरने निफ्टीपेक्षा चांगले प्रदर्शन केले आहे.

2021 मध्ये आतापर्यंत बीईएमएल मध्ये जवळपास 40 टक्क्यांची वाढ बघायला मिळाली आहे. जेव्हा याच काळात निफ्टीमध्ये 12 टक्के आणि BSE सेंसेक्स मध्ये 17 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली.

बीईएमएल (BEML) चं शेअर बाजारातील भांडवल जवळपास 5 हजार कोटी इतकं आहे. या स्टॉकने 9 मार्च 2021 ला 1,544 रुपयांचा आत्तापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. त्यानंतर या शेअर्सच्या किमतीमध्ये सतत कंसोलिडेशन बघायला मिळत आहे. (BEML share zooms)

Share Market
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताय, जर 'असं' असेल तर तुमचे गुंतवले पैसे काढताच येणार नाहीत..

एप्रिल 2021 मध्ये 1 हजार 130 रुपये इतकी घसरण झाल्यानंतर हे शेअर्स पुन्हा एकदा आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांकाजवळ दिसून आले. येत्या 2-3 महिन्यात हे शेअर्स 1600 रुपयांच्या आसपास पाहायला मिळतील असे जाणकारांचे म्हणणे आहे. हे शेअर्स जास्त काळासाठी ठेवले पाहिजेत असे जाणकारांचे मत आहे. सुरुवातीचे लक्ष्य 1550 असेल पण त्यासाठी 1200 रुपयांचा स्टॉपलॉस लावणे सुद्धा गरजेचे आहे.

खाण कंपन्यांसाठी खाजगी उपकरणे बनवणारी कंपनी

बीईएमएल ही एक सरकारी कंपनी आहे जी खाण कंपन्यांसाठी खाजगी उपकरणे तसेच खाणीची उपकरणे तयार करते. सरकारने या कंपनीतील आपला काही हिस्सा विकला आहे. सध्या सरकारची भागीदारी 54 टक्के तर 46 टक्के भागीदारी वित्तीय संस्था, विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार, बँका आणि कंपनीचे कर्मचारी यांच्याकडे आहे.

Share Market
१० हजारात सुरु करा स्वतःचा व्यवसाय; पहिल्याच महिन्यात कमवाल २५ ते ३० हजार रुपये

टार्गेट काय ?

प्रभुदास लिलाधरच्या वैशाली पारेख सांगतात की, या स्टॉकमध्ये नुकतीच एक शॉर्ट टर्म करेक्शन पाहिलं आहे. या शेअरच्या किमती तब्बल 1130 रुपयांपर्यंत खाली कोसळल्या होत्या. तळ पहिल्यानंतर शेअरमध्ये पुन्हा एकदा तेजी दिसू लागली आहे. पुढच्या महिन्यात ही तेजी कायम राहणार असल्याचे पाहू शकतो असेही त्या म्हणाल्या. सध्या या स्टॉकसाठी जवळपास 1290 रुपयांचा चांगला सपोर्ट दिसतो आहे आणि या किमतीच्यावर जाताना हा शेअर 1540 रुपयांना गाठू शकतो असेही वैशाली पारेख यांचे म्हणणे आहे.

या स्टॉकमध्ये 2-3 महिन्यांच्या कालावधीसाठी गुंतवणूक योग्य राहील, असा सल्ला त्यांनी दिला आहे. सध्या या शेअरवरील किमतीचं टार्गेट 1550 ते 1600 असेल आणि त्यानंतरच्या कोणत्याही ब्रेकआउटमुळे हा स्टॉक 1700-1750 पर्यंत जाईल.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Share Market
वर्षभरात लाखाचे केलेत सव्वा सहा लाख; 'या' कंपनीचे आपण सर्वच आहोत ग्राहक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()