तुम्ही आयकरच्या कक्षेत येत नसाल तरी करा ITR फाईल! जाणून घ्या फायदे

तुम्ही आयकरच्या कक्षेत येत नसाल तरीही करा आयटीआर फाईल! जाणून घ्या फायदे
 income tax returns
income tax returnsSakal
Updated on
Summary

तुम्ही आयकरच्या कक्षेत येत नसलात तरीही तुम्ही आयटीआर दाखल करू शकता.

तुम्ही आयकरच्या (Income Tax) कक्षेत येत नसलात तरीही तुम्ही आयटीआर (ITR) दाखल करू शकता. आर्थिक वर्ष 2020-21 साठी ITR दाखल करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे आणि 25 डिसेंबरपर्यंत देशात 4.43 कोटींहून अधिक आयकर रिटर्न भरले गेले आहेत. हिंदुस्तानशी बोलताना सीए अजय बगाडिया (CA Ajay Bagadiya) यांनी आयटीआर दाखल करण्याचे फायदे सांगितले आहेत. (Benefits of filing ITR even if you do not fall under the ambit of income tax)

 income tax returns
1 जानेवारीपासून GST मध्ये होणार अनेक बदल! 'या' क्षेत्रांवर परिणाम

आयटीआर फाइल करण्याचे लाभ

  • प्राप्तिकर विवरण (Income Tax Return) हा तुमच्या उत्पन्नाचा पुरावा आहे. हे सर्व सरकारी आणि खासगी संस्थांनी उत्पन्नाचा पुरावा म्हणून स्वीकारले आहे. जर तुम्ही नियमितपणे ITR करत असाल तर तुम्हाला बॅंकेकडून (Bank) कर्ज सहज मिळू शकते.

  • ITR भरल्यावर प्रमाणपत्र प्राप्त होते. जेव्हा जेव्हा ITR दाखल केला जातो तेव्हा फॉर्म 16 भरला जातो. फॉर्म 16 ती व्यक्ती जिथे नोकरी करत आहे तिथे उपलब्ध असते. अशा प्रकारे अधिकृतपणे प्रमाणित दस्तऐवज बनते, जे सिद्ध करते की त्या व्यक्तीचे वार्षिक निश्‍चित उत्पन्न इतके रुपये आहे. उत्पन्नाचा नोंदणीकृत पुरावा असणे तसेच क्रेडिट कार्ड (Credit Card), कर्ज किंवा स्वतःचे क्रेडिट सिद्ध करण्यास मदत करते.

  • अनेक देशांच्या व्हिसासाठी (Visa) 3 ते 5 वर्षांचे इन्कम टॅक्‍स रिटर्न मागवले जातात. ITR द्वारे ते तपासतात की ज्या व्यक्तीला त्यांच्या देशात यायचे आहे त्याची आर्थिक स्थिती काय आहे.

  • तुम्हाला कोणत्याही विभागासाठी कंत्राट मिळवायचे असेल तर तुम्हाला ITR दाखवावा लागेल. कोणत्याही सरकारी विभागात कंत्राट घेण्यासाठी गेल्या 5 वर्षांचा आयटीआर द्यावा लागतो.

  • तुम्हाला एक कोटी रुपयांचे विमा संरक्षण (Insurance Cover) (टर्म प्लॅन) घ्यायचे असेल, तर विमा कंपन्या तुम्हाला आयटीआर मागू शकतात. खरं तर, ते तुमच्या उत्पन्नाचा स्रोत जाणून घेण्यासाठी आणि त्याची नियमितता तपासण्यासाठी ITR वर भरवसा ठेवतात.

  • याशिवाय, तुम्हाला कर परतावा दावा करण्यासाठी आयटीआर फाइल करणे आवश्‍यक आहे. तुम्ही आयटीआर फाइल करता तेव्हा आयकर विभाग त्याचे मूल्यांकन करते. परतावा दिल्यास तो थेट बॅंक खात्यात जमा होतो. त्याच वेळी जर तुम्हाला तुमचा स्वतःचा व्यवसाय (Business) सुरू करायचा असेल तर आयटीआर भरणे खूप महत्त्वाचे आहे.

 income tax returns
RBI ची मोठी कारवाई! तीन बॅंकांना 30 लाखांहून अधिक रुपयांचा दंड

आयटीआर करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2021

एका ट्‌विटमध्ये (Twitter) प्राप्तिकर विभागाने (Income Tax Department) म्हटले आहे की, भरलेल्या एकूण रिटर्नपैकी 2.41 कोटींपेक्षा जास्त ITR-1 आणि सुमारे 1.09 कोटी ITR-4 आहेत. हे रिटर्न 2020-21 (आकलन वर्ष 2021-22) या आर्थिक वर्षासाठी भरले गेले आहेत. 25 डिसेंबर 2021 पर्यंत एकूण 4,43,17,697 ITR दाखल करण्यात आले आहेत, त्यापैकी 11,68,027 ITR एकाच दिवशी दाखल करण्यात आले आहेत, असे ट्‌विटमध्ये म्हटले आहे. वैयक्तिक आयटीआर दाखल करण्याची वाढीव मुदत 31 डिसेंबर रोजी संपत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.