आरोग्य आणि वैद्यकीय देखभाल खर्चांत वाढ झालेली दिसते, आजच्या तारखेत पुरेशी आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करणे आवश्यक होऊन बसले आहे. या स्थितीमुळे भारतात आरोग्य विमा (health insurance) योजनेच्या बाबतीत जनजागृती आणि मागणीत वाढ झालेली पाहायला मिळते. सर्वोच्च रकमेच्या विमा पॉलिसीला वाढलेल्या मागणीसह, सुधारीत विमा कवच जसे की, रिस्टोरेशन बेनिफिटचे वैशिष्ट्य त्यात समाविष्ट आहे. सध्या ते लोकप्रिय होते आहे.
आरोग्य विम्यात समाविष्ट ‘रिस्टोरेशन बेनिफिट ’चा अर्थ काय?
रिस्टोरेशन बेनिफिट अशी सुविधा आहे, जिथे विमा कंपन्या तुमच्या विमा संरक्षणाची मूळ रक्कम संपल्यानंतर पुनर्संचयित करतात. त्यामुळे जर तुम्ही संपूर्ण विमा रकमेचा वापर केला असेल, तरी काळजी करण्याचे कारण नाही. या वैशिष्ट्याचा वापर करून तुमच्या विमा रकमेचे रिस्टोरेशन करण्याचा फायदा मिळेल, ज्याचा वापर भविष्यात करता येईल.
अधिक सविस्तर समजून घेण्याकरिता, उदाहरण पाहूया. एखाद्या व्यक्तिने रु ५ लाखांचा विमा काढला असल्यास, कवचाची रक्कम दाव्यासाठी वापरण्यात आल्यास तसेच समान पॉलिसी कालावधीत दावा केल्यास, रिस्टोरेशन बेनिफिट रु ५ लाखांपर्यंत रिस्टोर करण्यात येईल. रिस्टोर विमा रक्कमेचा वापर समान पॉलिसी कालावधीत दावा परतावा करण्यासाठी वापरला जाईल.
आरोग्य विमा पॉलिसीकरिता रिस्टोरेशन बेनिफिट उपलब्ध करून देणे का आवश्यक आहे?
अलीकडे आरोग्य विषयक देखभालीच्या खर्चात भरमसाठ वाढ झालेली दिसते. बऱ्याचदा आपण काढलेल्या विम्याची रक्कम एखादा रुग्णालय भरतीसारखा अनपेक्षित प्रसंग उदभवलयास संपून जाण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत रिस्टोर बेनिफिट ‘सारखे आरोग्य विमा वैशिष्ट्य तुमच्या मदतीला येते. आवश्यकता भासल्यास, हा पर्याय अतिरिक्त संरक्षण कवच प्रदान करतो. परिणामी, विचारपूर्वक निवड करणे महत्त्वाचे ठरते. त्यामुळे स्वत:च्या आरोग्य विमा पॉलिसीत रिस्टोरेशन बेनिफिटचा समावेश करा.
रिस्टोरेशन बेनिफिट ‘चे प्रकार
रिस्टोरेशन पर्यायांचे दोन प्रकार उपलब्ध आहेत, आणि त्यांची निवड करण्यापूर्वी पॉलिसीधारकांनी त्यांच्या आरोग्य विमा पॉलिसीच्या दस्तावेजाचा अभ्यास करणे महत्त्वाचे ठरते:
● विमा रक्कम पूर्णपणे वापरणे- या स्थितीत, रिस्टोरेशन बेनिफिटचा लाभ विमा रक्कमेचा पूर्ण वापर केल्यानंतर उपलब्ध असतो.
● विमा रक्कमेचा अंशत: वापर- या पर्यायात, विमा रक्कमेचा अंशत: वापर केल्यास हा पर्याय लागू होतो.
आरोग्य विमा योजनेतील रिस्टोरेशन बेनिफिटचा लाभ कोणाला घेता येईल?
एखादा अनपेक्षित प्रसंग ओढावल्यास, त्याची काळजी रिस्टोरेशन बेनिफिट घेऊ शकते. कौटुंबिक आरोग्य विमा योजनेत (Family health insurance plans) रिस्टोरेशन बेनिफिटचा समावेश असतो. जेव्हा तुम्ही फमिली फ्लोटर प्लानमध्ये रिकव्हरी बेनिफिटची खरेदी करता, त्यावेळी संरक्षण कवच कुटुंबाच्या सदस्यत ‘तरंगते’ राहते. अशा स्थितीत रिस्टोरेशन बेनिफिट वैशिष्ट्य उपयुक्त ठरते.
रिस्टोरेशन बेनिफिटच्या नियम आणि अटी खालीलप्रमाणे आहेत
१.संबंध नसलेल्या आजारपणात लागू – बहुसंख्य आरोग्य विमा योजना रिस्टोरेशन बेनिफिट देऊ करतात. तुमचा सलग दावा एखाद्या संबंध नसलेल्या आजारपणाशी निगडीत असल्यास, तुम्ही रिस्टोरेशन बेनिफिटचा अवलंब करू शकता. दुसऱ्या दाव्यासोबत पहिल्या दाव्याचे काहीही देणे-घेणे नाही, हे यातून स्पष्ट होते. अशास्थितीत रिस्टोरेशन वैशिष्ट्याचा उपयोग होणार नाही.
२. विमा रकमेचा संपूर्ण वापर – बहुसंख्य योजनांमध्ये रिस्टोरेशन बेनिफिट उपलब्ध असून विम्याची रक्कम कमी पडल्यास या तरतुदीचा उपयोग करता येतो. विम्याची रक्कम दाव्याकरिता उपलब्ध असल्यास रिस्टोरेशन पर्याय दुसऱ्या दाव्यावर लागू होणार नाही.
३. रिस्टोरेशन रक्कम – बहुसंख्य योजना विमा रकमेकरिता संपूर्ण रिस्टोरेशन देऊ करते. काही प्रोग्राममध्ये हा भाग 50% पर्यंत असतो, तर अन्य 200% रिस्टोरेशनपर्यंत पात्र असू शकतो. त्याशिवाय, काही योजना तुम्हाला अॅड-ऑन खरेदी करून रिस्टोरेशन वाढविण्याची मुभा देतात.
रिस्टोरेशन लाभ निवडताना खालील मुद्यांचे भान ठेवा-
- रिस्टोरेशन लाभ हा वैकल्पिक लाभ असून हा तुमच्या विमा संरक्षण कवचात अतिरिक्त स्वरुपात खरेदी करता येतो
- मूळ विमा योजनेची खरेदी करताना हा पर्याय अतिरिक्त शुल्कासह उपलब्ध आहे
- ज्यावेळी तुम्ही विम्याची संपूर्ण किंवा अर्धी रक्कम वापरून टाकता त्यावेळी रिस्टोरेशन लागू होते
- विम्याची रिस्टोर रक्कम पुढील पॉलिसी वर्षात अग्रेषित होत नाही
- पॉलिसी वर्षात पहिल्यांदा दावा केल्यास रिस्टोरेशन लाभ लागू होत नाही
- विम्याच्या मोठ्या रकमेकरिता हे मर्यादित नसते; हे कोणत्याही विमा राशीवर लागू होते
- पॉलिसी कालावधी दरम्यान एकल दाव्यात तुमची एकंदर विमा रक्कम संपून गेल्यास रिस्टोरेशन लाभ पुनर्स्थापित होतो
- रिस्टोर लाभाकरिता केवळ भविष्यातील दावे पात्र असतील
तुम्ही स्वत: अथवा कुटुंबाकरिता आरोग्य विमा पॉलिसीची खरेदी करतेवेळी संपूर्ण माहिती समजून घेऊन त्यानंतर निर्णय घ्या. तुमच्या आरोग्य विमा पॉलिसीत रिस्टोरेशन लाभाची निवड करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.