अधिक परताव्यासाठी कोणते परदेशी म्युच्युअल फंड्स फायद्याचे?

भविष्यात चांगला परतावा मिळवण्यासाठी म्युच्युअल फंडामधील गुंतवणुकीकडे सध्या कल वाढताना दिसतोय.
Mutual-Fund
Mutual-Fund
Updated on

नवी दिल्ली : बँकांचे व्याजदर दिवसागणिक कमी होत आहेत. त्यातच महागाईतही वाढ होतेय. त्याबरोबर थेट शेअर बाजारात गुंतवणुकही अधिक जोखमीची आहे. म्हणूनच भविष्यात चांगला परतावा मिळवण्यासाठी म्युच्युअल फंडामधील गुंतवणुकीकडे सध्या कल वाढताना दिसतोय. यासाठी काही परदेशी म्युच्युअल फंड एक चांगला पर्याय ठरु शकतात. (best international mutual funds to reduce risk generate better returns)

तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक असाल तर त्यातील काही टक्के गुंतवणूक ही आवर्जून परदेशी फंड्समध्ये केल्याने तुमची जोखीम कमी होऊन अधिक परतावा मिळू शकतो, असं गुंतवणूक तज्ज्ञ सांगतात. नुकतेच काही काही म्युच्युअल फंड्स सुरु झाले आहेत जे थेट अमेरिका किंवा चीन यांसारख्या भारतापेक्षा मोठ्या बाजारपेठा असणाऱ्या देशांमध्ये थेट गुंतवणूक करतात त्यामुळे तुम्हाला चांगला परतावा देखील मिळतो.

परदेशी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे, न करणे हा नंतरचा भाग झाला. मात्र, तुम्हाला या प्रकारात कोणकोणते फंड्स मोडतात हे माहिती असणं गरजेचं आहे. तज्ज्ञांच्या मते तुमच्या पोर्टफोलिओमध्ये वैविध्य आणण्यासाठी आणि तुमची जोखीम कमी करण्यासाठी अमेरिका आणि चीन हे दोन देश योग्य असल्याचं बोललं जातं.

चीनमध्ये गुंतवणूक करण्यासाठी 'एडलवाईज ग्रेटर चायना ऑफशोर इक्विटी फंड', चीनच्या तुलनेत अमेरिकेत गुंतवणूक करण्यासाठी अधिक पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये नुकत्याच सुरु झालेल्या 'मोतीलाल ओसवाल नॅसडॅक फंड ऑफ फंड', त्याचसोबत 'मीराई असेट एनवायएसइ फॅंग ईटीएफ फंड', 'फ्रँकलिन इंडिया फिडर-फ्रँकलिन इंडिया अपॉर्च्युनिटी ग्रोथ फंड' असे काही म्युच्युअल फंड्स उपलब्ध आहेत.

नोंद : शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.