Best Stock : 14 वर्षांत गुंतवणूकदार कोट्यधीश… आता याच शेअरची डिलिस्ट होण्याची तयारी…

फक्त लाँग टर्मच नाही तर या शेअर्सने शॉर्ट टर्ममध्येही उत्कृष्ट नफा दिला आहे.
Best Stock
Best Stocksakal
Updated on

क्रॅक्स कॉर्न रिंग्ज आणि चीज बॉल्स बनवणाऱ्या डीएफएम फूड्सच्या (DFM Foods) शेअर्समध्ये सध्या दमदार तेजी दिसून येत आहे. त्यामुळे लाँग टर्म गुंतवणूकदारांना मजबूत परतावा मिळत आहे.

फक्त लाँग टर्मच नाही तर या शेअर्सने शॉर्ट टर्ममध्येही उत्कृष्ट नफा दिला आहे. गेल्या वर्षी डीएम फूड्सच्या शेअर्सने गुंतवणूकदारांची संपत्ती अवघ्या सहा महिन्यांत 154 टक्क्यांनी वाढवली आहे. डिएम फूड्सचे शेअर्स सध्या 456.75 रुपयांवर ट्रेड करत आहेत. (Best Stock this share gave best return read story )

9 जानेवारी 2009 रोजी, म्हणजेच 14 वर्षांपुर्वी डीएफएम फूड्सच्या शेअर्सची किंमत फक्त 4.03 रुपये होती. आता तो 113 पट वाढून 456.75 रुपयांवर आहे, म्हणजेच 14 वर्षांत गुंतवणूकदारांच्या 1 लाख रुपयांचे 1.13 कोटी रुपये झाले आहेत.

कमी काळातही या शेअर्सने उत्कृष्ट परतावा दिला आहे. गेल्या वर्षी 21 जून 2022 रोजी तो 187.25 रुपयांच्या एका वर्षातील नीचांकी पातळीवर होता. मात्र, अवघ्या 6 महिन्यांत तो 154 टक्क्यांनी वाढून 475 रुपयांवर पोहोचला.

Best Stock
Pharma Stock : साडे तीन हजाराचे झाले 1 कोटी, 'या' स्टॉकने गुंतवणुकदारांना केले मालामाल

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये डीएफएम फूड्सच्या शेअर्स डिलिस्टिंगसाठी 263.80 रुपये किंमत निश्चित केली होती. कंपनीतील 26.3 टक्के भागिदारी विकत घेण्यासाठी रिव्हर्स बुक-बिल्डिंगची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती आणि ऍडव्हेंट इंटरनॅशनलने उपकंपनी एआय ग्लोबल इन्व्हेस्टमेंट्सद्वारे आधीच आपला हिस्सा 73.70 टक्क्यांपर्यंत वाढवला होता. पण निश्चित केलेली किंमत भागधारकांनी नाकारली आणि 525 रुपये किंमतीची मागणी केली.

Best Stock
Stock Market : 1 लाखाचे 96 लाख, 6 वर्षात 'या' शेअरची कमाल...

467 रुपयांच्या किमतीवर चर्चा झाली आणि 13 डिसेंबर ते 5 जानेवारी दरम्यान टेंडर विंडो खुली राहिली. एक्सचेंज फाइलिंगमध्ये कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ऍडव्हेंट इंटरनॅशनलला 1.061 कोटी शेअर्स 467 रुपयांना मिळाले आणि डीलिस्टिंग ऑफर यशस्वी मानली गेली. ऍडव्हेंट इंटरनॅशनलकडे आता डीएफएम फूड्समध्ये 96.18 टक्के हिस्सा आहे.

डिलिस्टिंग केल्यावर, कंपनीच्या निर्णयांसाठी शेयरहोल्डर्सची मंजूरी घ्यावी लागणार नाही आणि कंपनीचे प्रमोटर्स कोणत्याही योजना किंवा गुंतवणुकीशी संबंधित कोणताही निर्णय घेऊ शकतील.

Best Stock
Share Market Opening : शेअर बाजारात घसरण सुरूच; 'या' शेअर्सचे मोठे नुकसान

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.