टॅरिफ वाढल्यामुळे, टेलिकॉम क्षेत्राचा महसूल आणि EBITDA मध्ये मजबूत वाढ होताना दिसत आहे
भारती एअरटेलच्या शेअर्समध्ये गेल्या एका वर्षात 32 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. या टेलिकॉम कंपनीचे शेअर्स आणखी 34 टक्क्यांनी वाढू शकतात असे मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या विश्लेषकांचे म्हणणे आहे. टॅरिफ वाढल्यामुळे, टेलिकॉम क्षेत्राचा महसूल आणि EBITDA मध्ये मजबूत वाढ होताना दिसत आहे, ज्याचा भारती एअरटेलला मोठा फायदा होऊ शकतो.
भारती एअरटेलला तीन गोष्टींचा फायदा होईल असे ब्रोकरेजचे म्हणणे आहे. यामध्ये 4G मिक्समधील सुधारणा, व्होडाफोन आयडियाकडून मार्केट शेअर वाढणे आणि टेरीफ अर्थात दरांमधील सतत वाढ यांचा समावेश आहे. यामुळे भारती एअरटेलचा EBITDA CAGR आर्थिक वर्ष 22 ते 24 दरम्यान 18 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे.
मोतीलाल ओसवालने भारती एअरटेलच्या शेअर्सना 910 रुपयांच्या टारगेटसह बाय रेटिंग दिले आहे. पुढील दोन वर्षांत कंपनीच्या भारत आणि आफ्रिका व्यवसायात चांगली वाढ होण्याची विश्लेषकांना अपेक्षा आहे.
दरम्यान, बुधवारी नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर (NSE) भारती एअरटेलचे शेअर्स 0.93 टक्क्यांनी वाढून 687.60 रुपयांवर दिसले. गेल्या एका महिन्यात कंपनीचे शेअर्स सुमारे 1.65 टक्क्यांनी घसरलेत. त्याच वेळी, भारती एअरटेलचे शेअर्स या वर्षाच्या सुरुवातीपासून 0.55 टक्क्यांनी घसरले आहेत. तरीही, गेल्या एका वर्षात त्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना 33 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.
कंपनीची आर्थिक स्थिती
FY22 च्या मार्च तिमाहीत भारती एअरटेलचे कंसॉलिडेटेड उत्पन्न 31,518.90 कोटी रुपये होते, जे गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 4.8 टक्के आणि गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत 22.02 टक्के जास्त होते. त्याच वेळी, मार्च तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 3,001.40 कोटी रुपये होता.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.