Rakesh Jhunjhunwala : राकेश झुनझुनवालांनी आपल्या मुलांसाठी मागं सोडली 'इतकी' संपत्ती!

राकेश झुनझुनवाला यांना शेअर मार्केटमधील बिग बूल असंही म्हटलं जातं.
Rakesh Jhunjhunwala
Rakesh Jhunjhunwalaesakal
Updated on
Summary

राकेश झुनझुनवाला यांना शेअर मार्केटमधील बिग बूल असंही म्हटलं जातं.

शेअर बाजारातील बिग बुल म्हणून ओळख असलेल्या राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांचं वयाच्या 62 व्या वर्षी निधन झालं. ते देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक होते. ते भारताचे वॅरेन बॉफे म्हणून ओळखले जायचे. शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करणारा प्रत्येक व्यक्ती राकेश झुनझुनवाला यांना ओळखतो. राकेश झुनझुनवाला यांना शेअर मार्केटमधील बिग बूल असंही म्हटलं जातं.

शेअर मार्केटमध्ये पैसे लावून झुनझुनवाला यांनी हजारो कोटींची संपत्ती जमवलीय. राकेश झुनझुनवाला यांनी ज्या शेअरमध्ये पैसे लावले त्याच शेअरमध्ये पैसे लावणारे लोकही अनेक आहेत. झुनझुनवाला यांचा जन्म 5 जुलै 1960 रोजी मुंबईत झाला. झुनझुनवाला यांनी आपल्या मागं मोठं व्यावसायिक साम्राज्य सोडलंय. त्यांच्या पश्चात पत्नी रेखा झुनझुनवाला, मुलगी निष्टा झुनझुनवाला (Nishtha Jhunjhunwala), आर्यवीर झुनझुनवाला (Aryavir Jhunjhunwala) आणि मुलगा आर्यमन झुनझुनवाला (Aryaman Jhunjhulwala) असा परिवार आहे.

Rakesh Jhunjhunwala
Bhagwant Mann : पंजाबमध्ये 'एक आमदार, एक पेन्शन' विधेयकाला मंजुरी

आकासा एअरमध्ये सर्वात मोठी भागीदारी

राकेश झुनझुनवाला यांची एकूण संपत्ती सुमारे 40 हजार कोटी आहे. त्यांच्या आकासा एअरमध्ये सर्वात मोठी भागीदारी त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला (Rekha Jhunjhunwala) यांच्याकडं आहे. दोघांचा एकूण वाटा 45.97 टक्के आहे. झुनझुनवाला यांनी नुकतीच आपली आकासा एअरलाईन्सही (Akasa Airlines) सुरू केली होती. 7 ऑगस्ट रोजी त्यांच्या कंपनीनं ऑपरेशन्सला सुरूवात केली होती. मुंबई ते अहमदाबाद दरम्यान आकासा एअरलाईन्सनं पहिलं उड्डाण घेतलं होतं. 13 ऑगस्ट पासून अकासा एअरनं अनेक मार्गांवर आपलं उड्डाण सुरू केलं होतं.

Rakesh Jhunjhunwala
'हर घर तिरंगा'ला अद्भूत प्रतिसाद, पंतप्रधान मोदी खुश; म्हणाले, तिरंग्याची ताकद काय आहे हे..

व्यापारी जगतात शोककळा

अवघ्या 5,000 ते 40,000 कोटी रुपयांचं साम्राज्य निर्माण करणाऱ्या राकेश झुनझुनवाला यांचं आज वयाच्या 62 व्या वर्षी मुंबईत निधन झालं. अहवालानुसार, तब्येतीच्या समस्यांमुळं त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथं त्यांनी सकाळी 6.45 वाजता अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या वृत्तानं संपूर्ण व्यापारी जगतात शोककळा पसरलीय.

Rakesh Jhunjhunwala
शरद पवारांनी उद्धव ठाकरेंवर लिंबू फिरवलाय, असं का म्हणाले शिंदे गटाचे गोगावले

राकेश झुनझुनवाला एक अदम्य व्यक्तीमत्त्व : मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राकेश झुनझुनवाला यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केलाय. ”राकेश झुनझुनवाला एक अदम्य व्यक्तीमत्त्व होते. जगाच्या अर्थकारणात त्यांचे मोठे योगदान आहे. ते भारताच्या प्रगतीसाठी खूप उत्साही होते. त्यांचे असे जाणे दुर्दैवी आहे. माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबासोबत आहेत. ओम शांती” असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.