मजबूत ऑर्डर बुक अन् सॉलिड फंडामेंटल्स असणारे शेअर्स

बजेटआधी खरेदी करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला
Top Shares to Buy
Top Shares to Buy File Photo
Updated on
Summary

तुम्हीही बजेटपूर्वी खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि मजबूत स्टॉक्स शोधत असाल तर तुम्ही तज्ज्ञांच्या सल्ल्याने खरेदी करू शकता. (Top Shares to Buy)

Budget Picks : शेअर बाजार (Share Market) हे असे ठिकाण आहे जिथे एका दिवसात मोठी रक्कम गुंतवून मोठी कमाई करता येते. मात्र, यासाठी गुंतवणूकदारांकडे (Investors) मजबूत आणि चांगले व्हॅल्युएशन असलेले स्टॉक्स (Stocks) असणे आवश्यक आहे. त्यासाठीच तज्ज्ञांचे मत विचारात घेणे गरजेचे आहे. तुम्हीही बजेटपूर्वी (Budget) खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि मजबूत स्टॉक्स शोधत असाल तर तुम्ही तज्ज्ञांच्या सल्ल्याने खरेदी करू शकता.

Top Shares to Buy
तेजीनंतर शुक्रवारी शेअर बाजारात पुन्हा घसरण!

बिर्ला कॉर्प (Birla Corp)

मार्केट एक्सपर्ट सिद्धार्थ खेमका यांनी त्यांच्या बजेट पिकमध्ये बिर्ला कॉर्पचा (Birla Corp) समावेश केला आहे. येत्या अर्थसंकल्पात सरकारचे लक्ष इन्फ्रा आणि रिअल इस्टेट क्षेत्रावर असेल असे खेमका यांचे म्हणणे आहे. ज्याचा थेट फायदा सिमेंट क्षेत्राला होणार आहे. त्यामुळेच त्यांनी बिर्ला कॉर्प (Birla Corp) शेअरला पुढील एक वर्षासाठी 1735 रुपयांचे टारगेट दिले आहे.

केईसी इंटरनॅशनल (KEC International)

मार्केट तज्ज्ञ अंबरीश बालिगा यांनी त्यांच्या बजेट पिकमध्ये केईसी इंटरनॅशनलची (KEC International) निवड केली आहे. बालिगांनी 'बाय' रेटिंगसह पुढील एका वर्षासाठी 578 रुपयांचे टारगेट दिले आहे. केईसी इंटरनॅशनल ही देशातील सर्वात मोठी पॉवर ट्रान्समिशन टॉवर उत्पादक कंपनी आहे. कंपनी अर्बन, वॉटर इन्फ्रा आणि डेटा सेंटरवरही काम करत आहे. क्रॉस कंट्री ऑइल आणि गॅस पाइपलाइनसह सिटी गॅस डिस्ट्रिब्‍यूशन नेटवर्कचे ईपीसी करत आहे.

Top Shares to Buy
उसळी घेतलेलं शेअर मार्केट पुन्हा झालं 'रेड'

एनसीसी (NCC)

मार्केट तज्ज्ञ सुदीप बंदोपाध्याय यांनी बांधकाम क्षेत्रातून कमाई करण्यासाठी एनसीसी (NCC) हा मजबूत स्टॉक निवडला आहे. यावर त्यांनी 110 रुपयांचे टारगेट दिले आहे. बांधकाम क्षेत्रातील कंपनीच्या ऑर्डर बुकमध्ये सातत्याने वाढ होत आहे. एनसीसी (NCC) ही तिच्या क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. याशिवाय सरकार पायाभूत क्षेत्रावर अधिक भर देण्याची शक्यता आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.