Share Market: शेअर बाजारात तेजीचा ट्रेंड, आज कोणत्या 10 शेअर्सवर लक्ष ठेवाल?

Share Market: बाजारात आठवड्याची चांगली सुरुवात झाली. निफ्टी 241 आणि सेन्सेक्स 936 अंकांनी वधारला, जाणून घ्या आजची वाटचाल कशी असेल
Share Market
Share Marketsakal media
Updated on

सेन्सेक्स-निफ्टी सोमवारी सलग पाचव्या दिवशी हिरव्या चिन्हात बंद झाले. सेन्सेक्स 935.72 अंकांच्या म्हणजेच 1.68 टक्क्यांच्या वाढीसह 56,486.02 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 240.85 अंकांच्या म्हणजेच 1.45 टक्क्यांच्या वाढीसह 16,871.30 वर बंद झाला. सोमवारच्या व्यवहारात बँकिंग, ऑटो आणि आयटी शेअर्समध्ये खरेदी झाली, तर रियल्टी, फार्मा आणि मेटलमध्ये नफावसूली दिसून आली.

बाजारात तेजीच्या ट्रेंडने कमबॅक केले आहे कारण गुंतवणूकदार आता टॅक्टिकल सेलमधून टॅक्टिकल बायकडे वळत असल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले. कमोडिटीजच्या किमती कमी होत चालल्याने गुंतवणुकीत पुन्हा एकदा वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. FII ची विक्री आणि क्रूडची वाढ थांबली आहे. रशिया-युक्रेनमुळेही सुधारणा दिसत असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे भारतीय बाजारपेठ चांगली कामगिरी करताना दिसेल. जगभरातील गुंतवणूकदार व्याजदरात वाढ करण्याच्या तयारीत आहेत. भारतातही WPI मध्ये वाढ झाली आहे पण बाजाराने त्याला फारसे महत्त्व दिले नाही असेही ते म्हणाले.

Share Market
Share Market : 'हे' दोन स्टॉक खरेदी करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला!

आज बाजाराची वाटचाल कशी असेल?

मार्च महिन्यातही बाजारात मोठ्या प्रमाणात अस्थिरता येण्याची शक्यता असल्याचे इक्विटी 99 चे राहुल शर्मा म्हणाले. यूएस फेडच्या व्याजदराशी संबंधित धोरणावर बाजाराची नजर असेल. याशिवाय देशांतर्गत चलनवाढीच्या आकडेवारीवरही बाजाराची नजर असेल. रशिया-युक्रेन युद्धाचा बाजाराच्या हालचालीवरही परिणाम होईल असे शर्मा यांचे म्हणणे आहे.

एलआयसीचा आयपीओ येत्या काळात बाजाराची दिशा ठरवण्यातही महत्त्वाची भूमिका बजावेल असे शर्मा यांचे म्हणणे आहे. निफ्टीला 16,800 वर मजबूत सपोर्ट दिसत आहे. जर ही पातळी इंट्राडेमध्ये तुटली तर निफ्टीला पुढील सपोर्ट 16690 आणि नंतर 16,600 वर असेल. वरच्या बाजूला, निफ्टीसाठी पहिला रझिस्टंस 17,000 वर दिसत आहे. जर निफ्टीने हा रझिस्टंस तोडला तर 17,100- 17,220 ची पातळी दिसू शकते.

निफ्टीने डेली टाईम फ्रेममध्ये फॉलिंग चॅनलमधून ब्रेकआउट दिल्याचे, जो की जो तेजीचे संकेत देत असल्याचे LKP सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले. याशिवाय निफ्टीने त्याच्या पूर्वीच्या स्विंग हायवर गेला आहे. हा देखील एक तेजीचा सेटअप आहे. जोपर्यंत निफ्टी या चॅनलवर राहील तोपर्यंत कल सकारात्मक राहील. खाली निफ्टीला 16,650 वर सपोर्ट दिसत आहे. त्याच वेळी, 17,000 वर रझिस्टंस दिसत आहे.

Share Market
Share Market: या 10 शेअर्सवर ठेवा नजर; जाणून घ्या शेअर बाजाराचा मूड

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

इन्फोसिस (INFY)

एचडीएफसी बँक (HDFCBANK)

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBIN)

ऍक्सिस बँक (AXISBANK)

आयसीआयसीआय बँक (ICICIBANK)

झी एन्टरटेन्मेंट लिमिटेड (ZEEL)

एसआरएफ (SRF)

भारतफोर्ज (BHARATFORG)

श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेड (SRTRANSFIN)

टीव्हीएस मोटर्स (TVSMOTORS)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.