पुढील दहा वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या स्थानी; चीन अमेरिकेलाही मागे टाकणार
नवी दिल्ली - सध्या कोरोनामुळे देशाच्या अर्थकारणाला खीळ बसली असली तरीसुद्धा देशाचा आर्थिक भविष्यकाळ हा उज्ज्वल आहे. भारत २०२५ मध्ये जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनेल पुढे २०३० मध्ये तो तिसरे स्थान घेईल, असा दावा सेंटर फॉर इकॉनॉमिक्स अँड बिझनेस रिसर्च (सीईबीआर) या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या वार्षिक अहवालात केला आहे. काेरोनामुळे अनेकांचे व्यवसाय अडचणीत आलेले असताना आणि विकासकामे खोळंबलेली असताना सीईबीआर संस्थेने केलेला दावा दिलासा देणारा आहे.
सध्या जागतिक क्रमवारीमध्ये भारत सहाव्या स्थानावर गेला असला तरीसुद्धा तो २०२५ मध्ये पुन्हा ब्रिटनला मागे टाकेल, यानंतर २०३० मध्ये तो तिसरे स्थान पटकावेल, असे अर्थशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. तसं पाहता भारताने २०१९ मध्ये ब्रिटनवर मात केली होती पण यंदा तो सहाव्या स्थानावर घसरला.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
कोरोनाचा देशाच्या अर्थकारणास मोठा फटका बसला आहे यामुळे ब्रिटनने पुन्हा भारताला मागे टाकले. ब्रिटनची ही आघाडी २०२४ पर्यंत कायम राहील. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये रुपया कमकुवत झाल्याने ब्रिटनला आघाडी घेणे सहज शक्य झाले.
भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर हा २०२१ मध्ये ९ टक्के एवढा राहण्याची शक्यता असून तो २०२२ मध्ये सात टक्के एवढा असेल. भारत आर्थिकदृष्ट्या विकसित देश बनल्यानंतर त्याच्या वाढीचा दर हा मंदावेल आणि तो नैसर्गिक असल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे.
भारताचे सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) हे २०३५ पर्यंत ५.८ टक्क्यांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. भारताच्या जीडीपीमध्ये घसरण झाली तरीसुद्धा २०३० पर्यंत तो जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनलेली असेल. तो २०२५ मध्ये ब्रिटन, २०२७ मध्ये जर्मनी आणि २०३० मध्ये जपानला देखील मागे टाकेल.
आर्थिक समीकरण
चीन होणार जागतिक महासत्ता
आर्थिक आघाडीवर मात्र चीनचा भाग्योदय होणार आहे. तो २०२८ मध्ये अमेरिकेलाही मागे टाकून महासत्ता बनेल. हे आर्थिक समीकरण पाच वर्षे आधीच बदलत आहे. यास कोरोना कारणीभूत आहे. कारण या संकटातून दोन्ही देश कसे सावरतात यावर अवलंबून आहेत. डॉलरच्याच निकषावर मोजायचे झाले तर २०३० पर्यंत तिसऱ्यास्थानी जपान कायम राहणार आहे.
Edited By - Prashant Patil
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.