Britannia Share Price : ब्रिटानियाचे शेअर्स उच्चांकावर, अवघ्या 33 हजारांत गुंतवणूकदार कोट्यधीश...

लाँग टर्मचा विचार केल्यास ब्रिटानियाच्या शेअर्सने अवघ्या 35 हजारांच्या गुंतवणुकीत आपल्या गुंतवणुकदारांना कोट्यधीश बनवले आहे.
Britannia Share Price
Britannia Share Price sakal
Updated on

वाडिया ग्रुपच्या ब्रिटानियासाठी (BRITANNIA) सप्टेंबर 2022 ची तिमाही अतिशय चांगली राहिली. त्यांचे मार्केट शेअर 15 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. तिमाही निकालानंतर दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी, शेअर्समध्ये खरेदीही वाढली आणि सोमवारी हा शेअर 4,189.95 रुपयांच्या ऑल टाईम हायवर पोहोचला.

गेल्या पाच दिवसांत ब्रिटानियाच्या शेअर्समध्ये 9 टक्क्यांहून अधिक वाढ दिसली. लाँग टर्मचा विचार केल्यास ब्रिटानियाच्या शेअर्सने अवघ्या 35 हजारांच्या गुंतवणुकीत आपल्या गुंतवणुकदारांना कोट्यधीश बनवले आहे. (Britannia Share raised investors are in profit share market )

Britannia Share Price
Chemical Stock: या केमिकल कंपनीचा 4000% पेक्षा जास्त परतावा, आता स्टॉक स्प्लिटचा निर्णय...

ब्रिटानियाचे शेअर्स 22 मार्च 1996 रोजी 13.47 रुपयांवर होते, जे सध्या 30,651 टक्क्यांच्या वाढीसह 4142.20 रुपयांवर आहे. म्हणजे त्या वेळी त्यात गुंतवलेले 33 हजार रुपये 20 वर्षांत 307 पटीने वाढून 1.01 कोटी रुपये झाले असते.

शॉर्ट टाईमबद्दल बोलायचे झाल्यास, या वर्षी 8 मार्च रोजी त्याची किंमत 3050 रुपये होती. हा एका वर्षातील नीचांक आहे. यानंतर, खरेदी वाढली आणि 7 नोव्हेंबरला अर्थात सोमवारी स्टॉकने 4189.95 रुपयांचा उच्चांक गाठला, म्हणजेच 8 महिन्यांत 37 टक्के वाढ झाली.

Britannia Share Price
Share Market: शेअर बाजारात पडझडीचं सत्र थांबलं, सेन्सेक्सची भरारी

एफएमसीजी सेक्टरच्या दिग्गज ब्रिटानियाचा कंसालिडेटेड नेट प्रॉफिट जुलै-सप्टेंबर 2022 मध्ये वार्षिक आधारावर 28 टक्क्यांनी वाढला. कंपनीने सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत 490 कोटी रुपयांचाकंसालिडेटेड नेट प्रॉफिट मिळवला, जो अंदाजापेक्षा जास्त होता. विश्लेषकांनी 451 कोटी रुपयांच्या नफ्याचा अंदाज व्यक्त केला होता. कंपनीचा व्यवसाय सलग 38 तिमाहीत वाढला आहे आणि मार्केट शेअर 15 वर्षांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला आहे.

Britannia Share Price
Share Market: शेअर बाजारात स्थिरता; सेन्सेक्स 61,319 तर निफ्टी 18,242 अंकावर

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.