51 वर्षीय जॉन्सन (Lord Jo Johnson) यांची लंडनस्थित इलारा कॅपिटल पीएलसीचे संचालक म्हणून गेल्या वर्षी जूनमध्ये नियुक्ती करण्यात आली होती.
लंडन : यूकेचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांचे धाकटे बंधू लाॅर्ड जो जॉन्सन यांनी अदानी एंटरप्रायझेसच्या (Adani Enterprises FPO) नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर (Follow-on Public Offering) पदाचा राजीनामा दिलाय.
ही UK फर्म आहे, ज्यानं भारतीय उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या कंपनीच्या FPO मध्ये गुंतवणूक केलीये. एक दिवस आधी अदानी यांनी आपला FPO मागं घेण्याची घोषणा केली होती, त्यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली.
द फायनान्शिअल टाईम्स या वृत्तपत्रानं यूके कंपनीज हाऊसच्या रेकॉर्डचा हवाला देत खुलासा केला की, 51 वर्षीय जॉन्सन (Lord Jo Johnson) यांची लंडनस्थित इलारा कॅपिटल पीएलसीचे संचालक म्हणून गेल्या वर्षी जूनमध्ये नियुक्ती करण्यात आली होती. बुधवारी अदानी समूहानं एफपीओ मागं घेण्याची घोषणा करताच जॉन्सन यांनी आपल्या राजीनामा दिला. Elara ही भांडवली बाजारातील गुंतवणूक फर्म आहे, जी भारतीय कॉर्पोरेट्ससाठी निधी उभारण्यात गुंतलेली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.