Budget 2020:आणि रेल्वे अर्थसंकल्पच बंद झाला!

lalu-prasad-yadav
lalu-prasad-yadav
Updated on

संपूर्ण भारताच्या दळणवळणासह मालवाहतुकीस रेल्वेएवढी मोठी व्यापक व्यवस्था नाही. त्यातही ब्रिटिश काळात प्रशासनाची परिणामकारकता राखण्यासाठीही त्याची आवश्यवकता होती. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यानंतर स्वतंत्र रेल्वे अंदाजपत्रक सादर करणे बंद केले... 

देशात जवळपास 92 वर्षे रेल्वे अर्थसंकल्प स्वतंत्रपणे सादर करण्यात येत होता. पण, अखेर तो बंद झाला. देशाच्या अर्थसंकल्पातच त्याचा समावेश करण्यात आला आहे. पण, रेल्वे अर्थसंकल्पाचा इतिहास खूप रंजक आहे. काही रेल्वे मंत्र्यांची भाषण आजही चर्चेचा विषय ठरतात.

ऍकवर्थ समितीची शिफारस 
- ब्रिटिशांच्या काळात, 1924 मध्ये ब्रिटिश अर्थतज्ञ विल्यम ऍकवर्थ यांची समिती रेल्वेच्या कामकाजाबाबत 1920-21 मध्ये नेमण्यात आली. ऍकवर्थ समितीने रेल्वेच्या कारभाराच्या आणि प्रशासकीय जबाबदारीच्या फेररचनेसह स्वतंत्र रेल्वे अंदाजपत्रक सादर करण्याची शिफारस केली. 1924 मध्ये पहिले स्वतंत्र रेल्वे अंदाजपत्रक सादर केले गेले. 

- स्वतंत्र भारताचे पहिले रेल्वे अंदाजपत्रक जॉन मथाई यांनी नोव्हेंबर 1947 मध्ये सादर केले. 

प्रभूंनी सादर केले शेवटचे अंदाजपत्रक 
- देशाच्या 92 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच, 2016 मध्ये रेल्वे अंदाजपत्रक अर्थसंकल्पात समाविष्ट करून, एकत्रित अर्थसंकल्प सादर केला गेला. 

- नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 21 सप्टेंबर 2016 रोजी रेल्वे आणि सर्वसाधारण अर्थसंकल्प यांच्या विलीनीकरणाला मंजुरी मिळाली आणि 92 वर्षांची प्रथा खंडीत झाली. शेवटचे रेल्वे अंदाजपत्रक सुरेश प्रभू यांनी सादर केले, त्याचवेळी त्यांनी देशाच्या व्यापक हितासाठी विलीनीकरण केल्याचे सांगितले. 

- रेल्वे अंदाजपत्रकाचे पहिले दूरचित्रवाणी प्रक्षेपण 24 मार्च 1994 रोजी केले गेले. 

लालूप्रसादांचा षटकार 
- 2004 ते मे 2009 या कालावधीत लालूप्रसाद यादव यांनी सलग सहा वेळा अंदाजपत्रक सादर केले. त्यांच्या काळातच 2009 मध्ये 108 अब्ज रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले. 

- रेल्वे अंदाजपत्रक सादर करणाऱ्या (2000) पहिल्या महिला रेल्वेमंत्री ठरल्या त्या ममता बॅनर्जी. 2002 मध्ये दोन वेगवेगळ्या आघाड्यांच्या वतीने (राष्ट्रीय लोकशाही आघाडी-एनडीए आणि संयुक्त पुरोगामी आघाडी-यूपीए) अंदाजपत्रक सादर करणाऱ्याही त्या पहिल्या महिला रेल्वेअर्थमंत्री ठरल्या. 

...आणि बुलेट ट्रेन 
- 2014 च्या अर्थसंकल्पात रेल्वेमंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी पहिल्यांदा बुलेट ट्रेनची घोषणा केली, तसेच नऊ हायस्पीड रेल्वेही सुरू केल्या. 

(सकाळ संशोधन आणि विकास विभाग)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.