Budget 2023: महाराष्ट्रासाठी अर्थसंकल्पात मोठी घोषणा! आदिवासींसाठी विशेष कार्यक्रम हाती

स्वातंत्र्याच्या शंभरीपर्यंत एका आजाराचं निर्मुलन करण्यात येणार आहे.
Mansukh Mandiviya
Mansukh Mandiviya
Updated on

Union Budget 2023: केंद्रीय अर्थसंकल्प आज जाहीर झाला यामध्ये महाराष्ट्रासाठी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार, महाराष्ट्राच्या आदिवासी भागातील सर्वात मोठी समस्या असलेल्या आजार म्हणजे सिकलसेल. या सिकलसेलचं सन २०४७ पर्यंत अर्थात स्वातंत्र्याच्या शंभरीत निर्मुलन करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. (Budget 2023 Big announcement for Maharashtra special program for tribal area)

Mansukh Mandiviya
Union Budget 2023: ज्येष्ठ नागरिकांसाठी खूशखबर! 'या' योजनेची गुंतवणूक मर्यादा वाढली; जाणून घ्या डिटेल्स

अर्थमंत्री सीतारामण यांनी घोषणा केली की, महिलांमध्ये आढळणाऱ्या अॅनिमियाच्या आजाराचं सन २०४७ पर्यंत निर्मुलन करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. हा महत्वाकांक्षी कार्यक्रम केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आखला असून त्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली.

या योजनेबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय म्हणाले, "अर्थसंकल्पात आरोग्य विभागाच्यावतीनं एक महत्वाची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार, आरोग्याच्या क्षेत्रास संशोधन करणाऱ्यांसाठी सरकारी प्रयोगशाळा उपलब्ध करुन दिल्या जातील. तसेच देश जेव्हा स्वातंत्र्याचा शंभरावा वर्धापन दिन साजरा करत असेल तोपर्यंत सिकलसेल अॅनेमियापासून भारत मुक्त झालेला असेल. सिकलसेल अॅनिमिया हा आपल्याकडं आदिवासी भागात खूपच सामान्य आणि गंभीर आजार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात यावर मिशन मोडवर काम करण्याची घोषणा करण्यात आली आहे"

Mansukh Mandiviya
Fadnavis on Budget: सर्वजणहिताय! अर्थमंत्री फडणवीसांनी केलं एकाच वाक्यात बजेटचं वर्णन

महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा - फडणवीस

फडणवीस म्हणाले, सिकलसेलचं निर्मुलन करायचं हा कार्यक्रम सुरु झालेला आहे. विशेषतः महाराष्ट्रातील आदिवासी भागात हा आजार मोठ्या प्रमाणात आहे, त्याच्या निर्मुलनाची घोषणा महत्वाची आहे. आमच्या आदिम जमाती आहेत, त्यांच्यासाठी जी योजना तयार करण्यात आली आहे ती देखील महत्वाची आहे.

आदिवासी विकासासाठी पिण्याचं पाणी, इलेक्ट्रिसिटी, रोजगार अशा प्रकारची ही योजना तयार करण्यात आली आहे. याचा मोठा फायदा आदिवासी विभागात होईल. तसेच विशेषतः एससी, एसटी, ओबीसी यांच्यासाठी ज्या योजना तयार करण्यात आल्या आहेत त्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी देण्यात आला आहे. त्यामुळं हा अर्थसंकल्प सर्वजनहिताय आहे, असंही फडणवीस यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.