Budget 2023 : केंद्र सरकारच्या एका वर्षाच्या आर्थिक तपशीलाला केंद्रीय अर्थसंकल्प म्हणतात. भारतात 1 एप्रिल ते 31 मार्च असे आर्थिक वर्ष असते, अशा परिस्थितीत सरकार नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी दरवर्षी सामान्य अर्थसंकल्प सादर करते.
हा अर्थसंकल्प देशाच्या सरकारसाठी जितका महत्त्वाचा आहे तितकाच सर्वसामान्यांसाठीही महत्त्वाचा आहे. जसे कोणत्याही कुटुंबाचे बजेट बनवले जाते, जेणेकरून त्यांचा घरखर्च कळू शकेल. अशा प्रकारे देशाचा अर्थसंकल्प तयार केला जातो.
देशाचे बजेट तुमच्या घराचे बजेटही ठरवते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला 2023-24 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असेल. त्यामुळे या अर्थसंकल्पाकडून लोकांना मोठ्या आशा आहेत.
पण बजेट हे नेहमीच तुमच्यासाठी फायदेशीर आणि तुमच्या अपेक्षा पूर्ण करणारे असावे, असे नाही. जास्त खर्चामुळे जसे घराचे बजेट बिघडते, तसेच काहीवेळा देशाच्या बजेटमध्येही असे होऊ शकते.
आज आम्ही तुम्हाला अशाच एका बजेटबद्दल सांगणार आहोत. ज्याला 'ब्लॅक बजेट' म्हणून ओळखले जाते. स्वतंत्र भारतात एक काळ असा होता की संपूर्ण देश संकटात सापडला होता आणि भारत सरकारच्या तत्कालीन अर्थमंत्र्यांना 550 कोटी रुपयांच्या तुटीचा अर्थसंकल्प सादर करावा लागला होता.
हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?
'ब्लॅक बजेट' कधी मांडले गेले :
1973-74 च्या अर्थसंकल्पाची गोष्ट आहे. 1971 मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झाले. त्यावेळी देशाची स्थिती अत्यंत वाईट होती. देश आर्थिक संकटाचा सामना करत होता. तसेच खराब मान्सूनमुळे देशात दुष्काळ पडला होता.
त्यावेळी देशात इंदिरा गांधींचे सरकार होते. या परिस्थितीमुळे सरकारचा खर्च त्याच्या उत्पन्नापेक्षा जास्त झाला होता आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला होता. तेव्हा तत्कालीन अर्थमंत्री यशवंतराव बी.चव्हाण यांनी देशाचा 'काळा अर्थसंकल्प' मांडावा लागला.
अर्थमंत्र्यांनी याला 'ब्लॅक बजेट' म्हटले होते :
1973-74 च्या या अर्थसंकल्पात 550 कोटी रुपयांची तूट होती. त्यावेळी तत्कालीन अर्थमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात देशात दुष्काळामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि अन्नधान्य उत्पादनात मोठी घट झाल्यामुळे अर्थसंकल्पीय तूट वाढल्याचे सांगितले होते.
त्यामुळेच 'ब्लॅक बजेट' सादर करण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हापासून हा अर्थसंकल्प 'ब्लॅक बजेट' म्हणून ओळखला जाऊ लागला. आजपर्यंत स्वतंत्र भारतात 'ब्लॅक बजेट' एकदाच सादर करण्यात आले आहे.
'ब्लॅक बजेट' म्हणजे काय?
जेव्हा सरकारचा खर्च त्याच्या उत्पन्नापेक्षा जास्त असतो तेव्हा सरकारला बजेटमध्ये कपात करावी लागते. अशा अर्थसंकल्पाला 'ब्लॅक बजेट' म्हणतात.
समजा सरकारची कमाई 200 रुपये आहे आणि त्याचा खर्च 250 रुपये आहे, तर ही तूट भरून काढण्यासाठी सरकार आपल्या बजेटमध्ये अनेक कपात करते. अशा अर्थसंकल्पाला 'ब्लॅक बजेट' म्हणतात.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.