Budget 2022: बजेटला निर्देशांकांचे थम्सअप; सेन्सेक्समध्ये 848 अंशांची वाढ

बजेटमुळे आज एकाच दिवसात सेन्सेक्स सुमारे 1,100 अंश वरखाली झाला.
budget effect on share market 2022
budget effect on share market 2022Sakal
Updated on

मुंबई : केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात फारशा प्रतिकूल तरतूदी नसल्याने भारतीय शेअरबाजार निर्देशांकांनी आज सव्वा ते दीड टक्क्यांच्या आसपास वाढ दाखवून बजेटला चांगला प्रतिसाद दिला. सेन्सेक्स 848.40 अंश तर निफ्टी 237 अंशांनी वाढला. (Share Market Effect Budget 2022)

बजेटमुळे आज एकाच दिवसात सेन्सेक्स सुमारे 1,100 अंश वरखाली झाला. अर्थसंकल्प सादर केल्यावर निर्देशांक हळुहळू वर गेले, नंतर दुपारी एकच्या सुमारास नफावसुलीमुळे ते चांगलेच खाली आले. पण त्या टप्प्यावरून पुन्हा खरेदी सुरु झाल्याने निर्देशांक पुन्हा वरच्या पातळीला गेले. आज सेन्सेक्स दुपारी 57,737.66 अंशांपर्यंत खाली घसरला होता. तर त्याचा दिवसभराचा उच्चांक 59,032.70 अंश होता. पण तो दिवसअखेरीस 58,862.57 अंशांवर स्थिरावला. दुपारी 17,244.55 अंशांपर्यंत घसरलेला निफ्टी, बाजार बंद होताना 17,576.85 अंशांवर स्थिरावला.

budget effect on share market 2022
'त्या' ऐतिहासिक बजेटवेळी खुद्द पंतप्रधानांनी मागितली होती माफी!

सरकारी बँकांच्या भांडवलासाठी नवी तरतूद नसल्याने आज त्या बँकांचे शेअर पडले. तर सिगरेटवर नवा कर नसल्याने आयटीसी चा शेअर साडेतीन टक्के म्हणजे साडेसात रुपयांनी वाढून 227 रुपयांवर स्थिरावला. आज निफ्टीच्या प्रमुख 50 शेअरपैकी 35 शेअरचे भाव वाढले. तर सेन्सेक्सच्या मुख्य 30 शेअरपैकी सात शेअरचे भाव पडले. यातही मारुती 37 रुपयांनी (बंद भाव 8,557 रु.) व महिंद्र आणि महिंद्र 14 रुपयांनी (870) पडला. उरलेल्यांपैकी रिलायन्स इंडस्ट्रीज, एनटीपीसी, एअरटेल, स्टेटबँक, पॉवरग्रीड हे शेअर फक्त एक ते साडेसहा रुपये असे किरकोळ पडले.

टाटास्टील 82 रुपये (1,167), सनफार्मा 57 रुपये (892), इंडसइंड बँक 50 रुपये (922) व लार्सन अँड टुब्रो 82 रुपये (1,991) व अल्ट्राटेक सिमेंट 297 रुपये (7,512) वाढला. हे शेअर टक्केवारीच्या हिशोबात सर्वात जास्त म्हणजे चार ते साडेसात टक्के वाढले. त्याखेरीज टायटन, एचसीएल टेक, आयसीआयसीआय (809), इन्फोसिस (1,772), टीसीएस (3,800), विप्रो (576), डॉ. रेड्डीज लॅब (4,311) या शेअरचे भावही वाढले.

आजचे सोन्याचांदीचे भाव

सोने - 48,980 रु.

चांदी - 60,900 रु.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()