Budget Pick: जर तुम्ही बजेटपूर्वी तुमच्या पोर्टफोलिओसाठी दर्जेदार स्टॉक शोधत असाल, तर हेल्थकेयर सेक्टरमधील कंपनी अपोलो हॉस्पिटल्स (Apollo Hospitals) हा एक चांगला पर्याय असू शकतो. कंपनीचे हेल्थकेअर क्षेत्रात मजबूत नेटवर्क आहे आणि ती देशातील सर्वात मोठ्या हॉस्पिटल चेनपैकी एक आहे. मार्केट एक्सपर्ट सिद्धार्थ खेमका यांनी त्यांच्या बजेट पिकमध्ये अपोलो हॉस्पिटल्सचा समावेश केला आहे. येत्या अर्थसंकल्पात सरकारचे लक्ष हेल्थकेअर क्षेत्रावर असेल. त्यामुळेच बजेटपुर्वी शेअर्स घ्यायचे असतील तर हा सर्वोत्तम स्टॉक आहे. (This stock in the healthcare sector will give strong returns you can buy)
अपोलो हॉस्पिटल्सचे शेअर्स हे आरोग्य सेवा क्षेत्रातील एक उत्तम निवड आहे. ही भारतातील प्रमुख हॉस्पिटल चेन आहे. त्यात 71 रुग्णालये आणि 10 हजारांहून अधिक बेड आहेत. याव्यतिरिक्त, एक 24X7 ऑनलाइन आणि ऑफलाइन फार्मसी चॅनेल आहे. सध्याच्या वातावरणावर नजर टाकली तर आरोग्य क्षेत्रात खूप घडामोडी सुरु आहेत. येत्या अर्थसंकल्पात सरकारचे लक्षही या क्षेत्रावर असेल. अपोलो हॉस्पिटल्सच्या स्टॉकसाठी 5,900 रुपयांचे टारगेट सिद्धार्थ खेमका यांनी निश्चित केले आहे.
18 जानेवारी 2022 रोजी अपोलो हॉस्पिटल्सच्या शेअरची किंमत सुमारे 4,590 रुपये आहे. म्हणजेच, गुंतवणूकदारांना सध्याच्या किंमतीपासून सुमारे 28 टक्के मजबूत परतावा मिळू शकतो. गेल्या एका वर्षात आतापर्यंत हा स्टॉक 75 टक्क्यांहून अधिक वाढला आहे. गेल्या 5 दिवसात हा स्टॉक मल्टीबॅगर ठरला आहे आणि गुंतवणूकदारांना 297 टक्के इतका चांगला परतावा मिळाला आहे.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.