बर्गर किंगच्या (Burger King) शेअर्समध्ये या महिन्यात मोठी घसरण, तुम्ही बर्गर किंगमध्ये गुंतवणूक करावी का ? काय सांगत आहेत ब्रोकरेज हाऊस, वाचा सविस्तर
बर्गर किंगच्या (Burger King) शेअर्सची लिस्टींग मागच्या डिसेंबरमध्ये झाली होती. बर्गर किंगने त्यांच्या गुंतवणुकदारांना सुरुवातीला चांगला परतावा दिला. पण या वर्षभरात बर्गर किंगचे शेअर्स 6 टक्क्याने घसरले आहेत. या दरम्यान सेन्सेक्स 16 टक्क्यांनी वाढला होता. फक्त ऑगस्ट महिन्याचा विचार केल्यास बर्गर किंगचे शेअर्स 9 टक्क्यांनी घटले आहेत. दुसरीकडे बर्गर किंगचे शेअर्स येत्या दिवसांत चांगली कमाई करतील असा विश्वास ब्रोकरेज हाऊसना वाटतो आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे बर्गर किंगच्या व्यवसायावर परिणाम झाला असला तरी 2021 च्या पहिल्या तिमाहीत बर्गर किंगचे प्रदर्शन चांगले राहिल्याचे ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओस्वाल यांनी म्हटले.
जुलै-ऑगस्ट मध्येही रिकव्हरी ट्रेंड सुरु आहे. त्यामुळेच ब्रोकरेज फर्म्सने बर्गर किंगचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. शिवाय टारगेट प्राइस 210 रुपये निश्चित केली आहे. 20 ऑगस्टला बर्गर किंगचे शेअर 3.28 टक्क्यांनी घटून 158 रुपयांवर बंद झाले. मागच्या काही वर्षांचा विचार केल्यास बर्गर किंगची सेल्स ग्रोथ 289 टक्के राहिली. प्रत्येक तिमाहीचा विचार केल्यास सेल्स ग्रोथ घसरल्याचे दिसून येते. याच दरम्यान बर्गर किंगने पाच स्टोअर्स आणखी सुरु केली आहेत. पण अद्याप एकही स्टोअर बंद करायची वेळ बर्गर किंगवर आलेली नाही, त्यामुळेच बर्गर किंगचे शेअर्स खरेदी करायचा सल्ला ब्रोकरेज हाऊस देत आहेत. कंपनीकडे आता एकूण 270 स्टोअर्स आहेत.
आयसीआयसीय सिक्युरिटीजनेही (ICICI Securities) बर्गर किंगचे शेअर्स खरेदी करायचा सल्ला दिला आहे. त्यांनी 200 रुपयांवर टारगेट प्राइस निश्चित केला आहे. टियर 2, टियर 3 आणि टियर 4 शहरांमध्ये स्टोअर्स चालत नसल्याचा मोठी फटका कंपनीला बसला आहे. शिवाय उत्तर आणि पूर्व भारतातही कंपनीची विक्री प्रभावित होऊ शकते असे आयसीआयसीय सिक्युरिटीजचे म्हणणे आहे. बर्गर किंग हे यूएस क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट चेनचे अमेरिकन युनिट आहे. बर्गर किंगची लिस्टिंग भारतात 14 डिसेंबर 2020 ला करण्यात आली होती. कंपनीचा इश्यू 60 रुपये होता तर याच लिस्टिंग 115 रुपयांवर झाली होती.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.