तुम्हालाही व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असेल तर आज आम्ही तुम्हालाा एका व्यवसायाची माहिती देणार आहोत. ज्यामध्ये तुम्ही एका दिवसात 4,000 रुपये सहज कमवू शकता आणि महिन्याचे 1,20,000 रुपये सहज कमवू शकता. इतकी कमाई करुन देणारा हा व्यवसाय कोणता असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर आम्ही कॉर्न फ्लेक्सच्या व्यवसायाबाबत (Corn Flakes Business) बोलत आहोत.
सकाळच्या नाश्त्यात बहुतेक घरांमध्ये कॉर्न फ्लेक्सचा (Corn Flakes) वापर केला जातो. कॉर्न फ्लेक्स आरोग्यासाठीही खूप चांगले मानले जाते. त्यामुळेच या व्यवसायाला मरण नाही. बरं, या व्यवसायात वापरल्या जाणार्या या मशिन्सचा वापर केवळ मक्यापासून बनवलेल्या कॉर्न फ्लेक्स बनवण्यासाठी केला जात नाही, तर गहू आणि तांदळाच्या फ्लेक्स बनवण्यासाठीही करता येतो. मक्याचे जास्त उत्पादन असलेल्या क्षेत्रात व्यवसाय सुरू केला तर तुम्हाला जास्त फायदा होईल. तुम्ही स्वतः मका पिकवला तर आणखी चांगले होईल.
या व्यवसायासाठी मशिन, वीज, जीएसटी क्रमांक, कच्चा माल, जागा आणि साठा ठेवण्यासाठी गोदाम लागेल. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडे जमीन असली पाहिजे जिथे तुम्ही मका पिकवू शकता. याशिवाय साठवणुकीसाठीही जागा आवश्यक आहे. आपल्याला गोदामाची देखील आवश्यकता असेल. तुमच्याकडे एकूण 2000 ते 3000 चौरस फूट जागा असावी.
एक किलो कॉर्न फ्लेक्स बनवण्यासाठी अंदाजे 30 रुपये खर्च येतो आणि बाजारात ते 70 रुपये किलो दराने सहज विकले जाते. जर तुम्ही एका दिवसात 100 किलो कॉर्न फ्लेक्स विकले तर तुमचा नफा सुमारे 4000 रुपये होईल. त्याच वेळी, जर तुम्ही महिन्याचा विचार केला तर तुम्हाला 1,20,000 रुपयांपर्यंत कमाई होईल.
किती गुंतवणूक ?
तुम्हाला सुरुवातीला किमान 5 ते 8 लाखांची गुंतवणूक करावी लागणार आहे. मोदी सरकार मुद्रा कर्ज योजना चालवत आहे. या अंतर्गत सरकार स्टार्ट अप बिझनेस करणाऱ्यांना 90 टक्क्यांपर्यंत कर्जाची सुविधा देते. ज्याचा लाभ तुम्ही घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.