Business Ideas : प्रत्येकालाच नोकरी करायची नसते, अनेकांना स्वतःचा बिझनेस करायची इच्छा असते. पण भांडवलाची कमतरता याशिवाय अशा बऱ्याच गोष्टी आहेत, ज्यामुळे मध्यमवर्गीय बिझनेसच्या फंदात पडत नाहीत. पण आज आम्ही तुम्हाला कमीत कमी भांडवलात कोणता व्यवसाय सुरु करावा याविषयी सांगणार आहोत.
हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....
आम्ही तुम्हाला अशा काही बिझनेस आयडियाज सांगणार आहोत ज्यामधून तुम्ही बक्कळ कमाई करू शकाल. हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळ्यात प्रत्येक ऋतूत खाल्ला जाणारा हा पदार्थ आहे. याशिवाय लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण ते अगदी आवडीने खातात. एवढेच नाही तर खेड्यांपासून शहरांपर्यंत या उत्पादनाची मागणी कायम आहे.
आम्ही काजू शेतीबद्दल (Cashew Farming) बोलत आहोत. आता देशातील शेतकरी पारंपरिक शेती सोडून नगदी पिकांवर अधिक भर देत आहेत. सरकारही आपल्या स्तरावर सातत्याने शेतकऱ्यांना जागरूक करत आहे. काजू हे ड्रायफ्रूट म्हणून खूप लोकप्रिय मानले जाते. काजूच्या झाडाची लांबी 14 मीटर ते 15 मीटर किंवा त्याहून अधिक असते. त्याची झाडे 3 वर्षात फळ देण्यास तयार होतात.
काजूशिवाय त्याच्या सालींचाही वापर केला जातो. सालीपासून पेंट आणि स्नेहक तयार केले जातात. त्यामुळे त्याची लागवड अत्यंत फायदेशीर मानली जाते. काजूचे रोप उष्ण तापमानात चांगले वाढते. त्याच्या लागवडीसाठी योग्य तापमान 20 ते 35 अंशांच्या दरम्यान आहे. शिवाय, ते कोणत्याही प्रकारच्या मातीवर घेतले जाऊ शकते. तरीही, यासाठी लाल वालुकामय चिकणमाती माती चांगली मानली जाते.
कुठे होऊ शकते काजूची शेती ?
एकूण काजू उत्पादनात भारताचा वाटा 25 टक्के आहे. केरळ, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये याची लागवड केली जाते. मात्र, आता झारखंड आणि उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्येही त्याची लागवड केली जात आहे.
किती कमाई होते?
काजूचे झाड एकदा लावले की, त्याला अनेक वर्ष फळे येतात. एक हेक्टरमध्ये 500 काजूची झाडे लावता येतात. एका झाडापासून अंदाजे 20 किलो काजू मिळतात. एक हेक्टरमध्ये 10 टन काजूचे उत्पादन घेतले जाते. त्यानंतर प्रक्रियेचा खर्च येतो. बाजारात काजू 1200 रुपये किलोने विकला जातो. अशा परिस्थितीत जर तुम्ही जास्त प्रमाणात झाडे लावलीत तर, तुम्ही आरामात कोट्यधीश बनू शकता.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.