सिमेंट क्षेत्रातील 100 रुपयांपेक्षा कमी किमतीचा 'हा' शेअर बजेटपूर्वी खरेदी करा

shares
sharesesakal
Updated on

अर्थसंकल्पापूर्वी बाजारात कायम अस्थिरता दिसून आली आहे. प्री-बजेट विक्रीही होते. अशा परिस्थितीत, गुंतवणूकदारांनी मजबूत फंडामेंटल्स असलेले शेअर्स घेणे महत्त्वाचे आहे. ब्रोकरेज हाऊस अॅक्सिस सिक्युरिटीज आणि एमके ग्लोबल यांनी सिमेंट क्षेत्रातील स्टार सिमेंट (star cement) हा शेअर निवडला आहे. 100 रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या या स्टॉकमध्ये खरेदीचा सल्ला दिला आहे. Axis Securities ने 105 रुपयांचे टारगेट दिले आहे आणि Emkay ने 120 रुपयांचे टारगेट दिले आहे.

shares
अर्थसंकल्प सोप्या भाषेत समजून घेताना

ब्रोकरेज हाऊसचे मत

ब्रोकरेज फर्म एमकेचे (Emkay) म्हणणे आहे की, वेगाने वाढणाऱ्या ईशान्येकडील (North Eastern market) बाजारपेठेत स्टार सिमेंटची मजबूत पकड आहे. या क्षेत्रातील कंपनीचा बाजारातील हिस्सा जवळपास 23 टक्के आहे. कंपनीची नेट कॅश पोझिशन आणि RoIC भांडवलाच्या खर्चापेक्षा वर आहे. यामुळे कंपनीला चांगला सपोर्ट मिळत आहे. ब्रोकरेजने खरेदीचा सल्ला कायम ठेवत टारगेट 130 रुपयांवरून 120 रुपये केले आहे.

कंपनीची व्हॉल्यूम ग्रोथ चांगली असल्याचे अॅक्सिस सिक्युरिटीजचे (Axis Securities) म्हणणे आहे. FY21-23 मध्ये कंपनीचा महसूल/Ebitda/APAT 22%/16%/26% CAGR ने वाढण्याची अपेक्षा आहे. ब्रोकरेजने कंपनीला 'बाय' रेटिंग दिले आहे. मात्र, टारगेट 115 रुपयांवरून 105 रुपये करण्यात आले आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.