दिवाळीनिमित्त सोनं खरेदी करताय? ‘या’ गोष्टींकडे लक्ष द्या..!

gold
goldesakal
Updated on

मुंबई : दिवाळी आणि धनत्रयोदशी (diwali and dhanteras festival) निमित्त सोन्याचे दागिने खरेदी (gold jewellery) करण्यासाठी ग्राहकांकडून महत्व दिले जाते. यंदा देखील नागरिक मोठ्या प्रमाणावर सोन्याचे दागिने खरेदी करण्याची तयारी करताना दिसत आहेत. जर तुम्ही दागिन्यांच्या दुकानात जाऊन खरेदी करत असाल तर नक्कीच ही काळजी घेतलीच पाहिजे. जेणेकरून तुमची दिशाभूल होणार नाही.

कोरोनामुळे दीड वर्षानंतर बाजारपेठत वस्तू खरेदीसाठी नागरिकांचा मोठा उत्साह दिसून येत आहे. दिवाळीच्या निमित्ताने सोने खरेदीला नागरिक पसंती देत आहेत. या वेळी खास करून महिला, तरुणी यांच्याकडून तयार दागिन्यांना पसंती देतात. तर अनेकांनी या दिनानिमित्त सोने खरेदी करणे चांगले असल्याने अनेक गुंतवणूक म्हणून सोन्याची नाणी, शिक्के यांची खरेदी करतात. जर तुम्ही या सणात ज्वेलर्सच्या दुकानात जाऊन सोने खरेदी करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी असून ज्याच्या मदतीने तुम्ही योग्य किमतीत शुद्ध दागिने खरेदी करू शकाल आणि ज्वेलर्स तुमची दिशाभूल करू शकणार नाहीत.

अशी घ्या काळजी

कॅरेट

जेव्हा तुम्ही सोनं खरेदी करायला ज्वेलर्सच्या दुकानात जाता, तेव्हा तुम्हाला हे अवश्य माहित असलं पाहिजे, बाजारात उपलब्ध असलेले बहुतेक दागिने 22 कॅरेट आणि 18 कॅरेटचे असतात. 24 कॅरेट सोन्याचे दागिने बनत नाहीत. त्यामुळे खरेदी करताना त्या दिवशी सराफा बाजारात सोन्याचा भाव काय असेल हे निश्चितपणे लक्षात ठेवा. ज्याच्या मदतीने तुम्ही योग्य दरात दागिने खरेदी करू शकता.

मेकिंग चार्जेस

मेकिंग चार्जेसचा सर्वाधिक फायदा ज्वेलर्सना होतो. बहुतेक ज्वेलर्स मेकिंग चार्जेस कमी करण्यास नकार देतात. त्यामुळे दागिन्यांच्या मेकिंग शुल्काबाबत बोलणी जरुर करा. कारण दागिन्यांवर 30 टक्के मेकिंग चार्ज घेतला जातो.

gold
Share Market: आज कोणत्या शेअर्सवर नजर ठेवाल?

हॉलमार्क

सोन्याच्या शुद्धतेसाठी फक्त हॉलमार्क असलेले दागिने खरेदी करा. हॉलमार्कमध्ये पाच अंक असतात. प्रत्येक कॅरेटचे वेगळे हॉलमार्क आहे. उदाहरणार्थ, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले असते. यामुळे त्याच्या शुद्धतेबद्दल शंका नाही.

GST

तुम्ही दागिन्यांसाठी ऑनलाइन पेमेंट करा किंवा ऑफलाइन, तुम्हाला त्यावर फक्त 3% GST भरावा लागेल. याशिवाय, जर ज्वेलर्स कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारत असतील तर तुम्ही प्रश्न विचारू शकता. कारण काही ज्वेलर्स पॉलिश वजन किंवा मजूर शुल्काच्या नावाखाली काही रुपये वेगळे घेतात, जे नियमाविरुद्ध आहे. आपण ते देई नका आणि ज्वेलर्सविरूद्ध तक्रार देखील करू शकता.

gold
SGB : मोदी सरकारकडून स्वस्तात सोनेखरेदीची संधी!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.