Campus Activewear Stock ला आउटपरफॉर्म रेटिंग, नवीन टारगेट किती ?

FY21-24C मध्ये, महसुलात 3 पट वाढ आणि EBITDA मध्ये 4 पट वाढ दिसू शकते असे ब्रोकरेजचे म्हणणे आहे.
stock market
stock market Sakal
Updated on

शेअर बाजारात पैसे कमवण्यासाठी ब्रोकरेज कंपन्या आणि बाजारातील तज्ज्ञ वेगवेगळ्या शेअर्सवर खरेदी किंवा विक्री करण्याचा सल्ला देत असतात. अशात ब्रोकरेज कंपनी CLSA ने पादत्राणे बनवणाऱ्या कॅम्पस ॲक्टिव्हवेअरवर मत दिले आहे.

गुंतवणूकदारांनी काय करावे?

ग्लोबल ब्रोकरेज कंपनी CLSA ने या शेअरवर आउटपरफॉर्म रेटिंग कायम ठेवली आहे आणि गुंतवणूकदारांना 370 रुपये टारगेट दिले आहे.(Stock) मॅन्यूफॅक्चरिंगमध्ये मजबुती दिसत आहे आणि डिस्ट्रीब्यूशनमुळे कंपनीची स्थिती सुधारली आहे.

याशिवाय कंपनीची क्षमता आणि रणनीती यांचा डिमांडवर परिणाम झाला आहे. ही कंपनी क्रीडा (Sports) आणि ऍथलीट फुटवेअरमध्ये दिग्गज आहे. FY21-24C मध्ये, महसुलात 3 पट वाढ आणि EBITDA मध्ये 4 पट वाढ दिसू शकते असे ब्रोकरेजचे म्हणणे आहे.

stock market
Stocks to Buy: तगडा रिटर्न देतील 'हे' शेअर्स, तज्ज्ञांना विश्वास

स्टॉकची कामगिरी

ब्रोकरेज कंपनीने शेअरबाबत आपले मत दिल्यानंतर शेअरमध्ये ॲक्शन होताना दिसून आली. 28 जूनला या शेअरमध्ये 2 टक्क्यांहून अधिक तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच कंपनीचा IPO आला होता.

बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर 355 रुपयांवर लिस्टिंग झाली आणि गुंतवणूकदारांना 21.58 टक्क्यांपर्यंत परतावा मिळाला. या व्यतिरिक्त, हा स्टॉक NSE म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्ये 360 रुपयांवर लिस्ट झाला होता आणि 23.29% च्या प्रीमियमसह NSE वर लिस्ट झाला होता. कॅम्पस ऍक्टिव्हवेअर IPO ची इश्यू प्राइज 292 रुपये निश्चित करण्यात आली होती.

stock market
Titan Shares : 'टायटन'चे शेअर्स देतील दमदार परतावा, दिग्गजांना विश्वास

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.