Cash Market मधील हे 2 स्टॉक्स देतील मजबूत परतावा!

हे शेअर्स खरेदी केल्यास शॉर्ट ते लाँग टर्ममध्ये चांगले पैसे मिळू शकतात.
Share
ShareSakal
Updated on
Summary

हे शेअर्स खरेदी केल्यास शॉर्ट ते लाँग टर्ममध्ये चांगले पैसे मिळू शकतात.

Stocks to Buy : शेअर बाजार (Share Market) तज्ज्ञ विकास सेठी यांनी तुमच्यासाठी 2 मजबूत स्टॉक्स (Stocks) निवडले आहेत. जर तुम्ही शेअर बाजारात खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमचा पोर्टफोलिओ (Portfolio) अधिक मजबूत बनवायचा असेल तर तुम्ही त्यांच्या सल्ल्याने खरेदी करू शकता. हे शेअर्स खरेदी केल्यास शॉर्ट ते लाँग टर्ममध्ये चांगले पैसे मिळू शकतात. शेअर बाजार तज्ज्ञ विकास सेठी यांनी कॅश मार्केटचे 2 मजबूत स्टॉक्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. वेसुवियस इंड (Vesuvius Ind) आणि वर्धमान टेक्सटाईलची (Vardhman Textile) निवड केली आहे.

Share
2022 मध्ये दिसणार 5G चा दम! 'या' टेलिकॉम शेअर्समधून मिळेल बंपर परतावा

वेसुवियस इंड (Vesuvius Ind)

ही अमेरिका स्थित एमएनसी (MNC) कंपनी आहे. ही रेफ्रेटरी गुड्स ट्रेडिंग आणि मॅन्युफॅक्चरिंगची ग्लोबल लीडिंग कंपनी आहे. याशिवाय, इनोव्हेशन आणि कस्टमायझर सोल्यूशन्ससाठी ही कंपनी ओळखली जाते.

कंपनीचे फंडामेंटल्स?

कंपनीचे फंडामेंटल्स अतिशय भक्कम आहेत. या कंपनीवर कोणतेही कर्ज नाही. यावर्षी कंपनीने सप्टेंबर तिमाहीत मजबूत निकाल सादर केले. कंपनीने या काळात 19 कोटी रुपयांचा नफा दिला, तर गेल्या वर्षी 16 कोटी रुपयांचा नफा दिला होता.

वेसुवियस इंड (Vesuvius Ind)

- सीएमपी (CMP) - 1130 रुपये

- टारगेट (Target) - 1160 रुपये

- स्टॉपलॉस (Stop Loss) - 1080 रुपये

Share
‘आरटीई’चा दोन कोटींचा फी परतावा शाळांना तत्काळ द्या!

वर्धमान टेक्सटाईल (Vardhman Textile )

सध्या टेक्सटाइल सेक्टरबाबत ते खूप उत्सुक असल्याचे सेठी म्हणाले. सरकारची पीएलआय योजना आणि चीनवर अमेरिकेचे निर्बंध पाहता भारताच्या टेक्सटाइल सेक्टरला मोठा फायदा होणार आहे.

वर्धमान टेक्सटाईल (Vardhman Textile)

- सीएमपी (CMP) CMP - 2601 रुपये

- टारगेट (Target) - 2750 रुपये

- स्टॉपलॉस (Stop Loss) - 2570 रुपये

वर्धमान टेक्सटाईल 75 पेक्षा जास्त देशांना माल पुरवते. सप्टेंबरच्या तिमाहीत कंपनीला 472 कोटी रुपयांचा नफा झाला होता. तर गेल्यावर्षी 56 कोटी रुपयांचा नफा सादर झाला होता. तर डेट इक्विटी रेश्यो 0.29 टक्के आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.