Cardless Cash Withdrawal : एटीएम कार्डशिवायही काढू शकता पैसे; अशी आहे पद्धत

आरबीआयच्या आदेशानंतर देशातील अनेक बँका एटीएम कार्ड नसतानाही ग्राहकांना पैसे काढण्याची सुविधा देत आहेत.
atm
atmsakal
Updated on

Cardless Cash Withdrawal : जर तुमचे एटीएम-डेबिट कार्ड घरी विसरले आणि तुम्हाला एटीएममधून पैसे काढायचे असतील तर काळजी करण्याची गरज नाही. डेबिट कार्ड नसतानाही तुम्ही एटीएममधून पैसे काढू शकता. आरबीआयच्या आदेशानंतर देशातील अनेक बँका एटीएम कार्ड नसतानाही ग्राहकांना पैसे काढण्याची सुविधा देत आहेत. अलीकडेच, रिझर्व्ह बँकेने ग्राहकांसाठी एक नवीन सुविधा सुरू केली आहे, ज्याद्वारे ग्राहक केवळ UPI च्या मदतीने एटीएम कार्डशिवाय पैसे काढण्याचा फायदा घेऊ शकतात. कार्डलेस कॅश काढण्याच्या सुविधेमुळे स्किमिंगम आणि कार्ड क्लोनिंग यांसारख्या फसवणूकीच्या घटना रोखण्यात मदत होईल.

हेही वाचा : का हवे विचारांचे नियम आणि वास्तविक भान !

बँक ग्राहकांना एटीएम कार्ड नसतानाही कार्डलेस कॅश विथड्रॉवलची सुविधा मिळू शकेल. बँकांनी एटीएममध्ये बदल करून UPI ​​पर्याय अपडेट केला आहे. खालील पद्धतींनी UPI द्वारे ग्राहक पैसे काढू शकतात.

पहिली पद्धत -

  • UPI द्वारे एटीएममधून कार्डलेस कॅश काढण्यासाठी, सर्वप्रथम Request तपशील एटीएम मशीनमध्ये भरावे लागतील.

  • हा तपशील भरल्यानंतर, तुमच्याकडे एक QR कोड तयार होईल.

  • त्यानंतर तुम्हाला तुमचे UPI अॅप उघडावे लागेल आणि तो QR कोड स्कॅन करावा लागेल.

  • स्कॅन केल्यानंतर, तुमची विनंती मंजूर केली जाईल.

  • यानंतर, तुम्हाला किती रक्कम काढायची आहे ते लिहावे लागेल, त्यानंतर तुम्ही एटीएम मशीनमधून पैसे काढू शकता.

atm
Amazon चा सर्वात स्वस्त प्राइम व्हिडिओ प्लॅन लॉन्च; वाचा काय आहे प्लॅन

दुसरी पद्धत -

  • दुसर्‍या प्रकारे, UPI आयडी एटीएम मशीनमध्ये भरावा लागतो.

  • यानंतर काढायची रक्कम लिहावी लागेल.

  • यानंतर तुमच्या UPI अॅपवर एक विनंती येईल

  • तुम्हाला अॅपमध्ये पिन टाकून विनंती मंजूर करावी लागेल.

  • ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्ही एटीएममधून पैसे काढू शकाल.

atm
5G Smartphones : 'हे' आहेत 25 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीचे बेस्ट 5G स्मार्टफोन

एचडीएफसी बँकेच्या वेबसाइटनुसार, कोणताही लाभार्थी केवळ मोबाइल नंबरद्वारे एटीएमधून डेबिट-एटीएम कार्डशिवाय पैसे काढू शकतो.

  • सर्वप्रथम, तुम्हाला एचडीएफसी बँकेच्या नेटबँकिंगमध्ये लॉग इन करावे लागेल. त्यानंतर Transfer Funds वर क्लिक करा.

  • त्यानंतर कार्डलेस कॅश विथड्रॉवल वर क्लिक करा.

  • डेबिट खाते आणि लाभार्थी तपशील निवडल्यानंतर, सुरू ठेवा वर क्लिक करा.

  • तुमच्या मोबाईल नंबरवर मिळालेला OTP  टाका. ज्यामुळे कार्डलेस पैसे काढण्याची विनंती तयार होईल.

  • कार्डलेस रोख पैसे काढण्याची विनंती 24 तासांसाठी वैध असेल. विनंती 24 तासांनंतर कालबाह्य होईल.

  • लाभार्थ्याला एचडीएफसी बँकेच्या एटीएमला भेट द्यावी लागेल. स्क्रीनवर दिसणारा कार्डलेस कॅश पर्याय निवडावा लागेल.

  • यानंतर OTP, तुमचा मोबाईल नंबर, 9 क्रमांकाचा ऑर्डर आयडी आणि रक्कम लिहावी लागेल.

  • सर्व तपशील बरोबर आहे की नाही ते पाहून झाल्यानंतर एटीएममधून रक्कम काढता येईल.

  • HDFC वेबसाइटनुसार, कार्डलेस कॅश विथड्रॉवलद्वारे, तुम्ही दररोज 100 रुपये ते 10,000 रुपये आणि दरमहा रुपये 25,000 पर्यंतचे व्यवहार करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.