PNB Fraud Case : मेहुल चोक्सीला मोठा दणका; सीबीआयने केले 3 नवीन FIR दाखल

भारत सरकार मेहुल चोक्सीला भारतात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे
Mehul Choksi
Mehul Choksiesakal
Updated on

केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) बँक घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सी आणि इतर अनेक आरोपींविरुद्ध तीन नवीन FIR नोंदवले आहेत. सीबीआयने नोंदवलेल्या तिन्ही एफआयआरनुसार, मेहुल चोक्सीची कंपनी गीतांजली जेम्स आणि नक्षत्र ब्रँड्सने अनेक बँकांची सुमारे 6,746 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे.

सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरनुसार, पंजाब बँक ऑफ इंडियासह 9 बँक समूहातील मेहुल चोक्सीशी संबंधित कंपन्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे LOU जारी केल्याचा आरोप आहे, नंतर या सर्व कंपन्यांना एनपीए (NPA) घोषित करण्यात आले.

हेही वाचा : द वॉल ढासळतेय का?

या आधारे त्या 9 बँकांचे सुमारे 6,746 कोटींचे नुकसान झाले. हे 1 एप्रिल 2010 ते 31 जानेवारी 2018 या कालावधीतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचे प्रकरण आहे.

त्यानंतर, सर्व प्रकरणांचा तपास करून, सीबीआयने 14 डिसेंबर 2022 रोजी तीन नवीन एफआयआर नोंदवले आहेत. सीबीआयने नोंदवलेल्या या तीन नवीन एफआयआरनुसार, एफआयआरमध्ये मेहुल चोक्सी आणि त्याच्याशी संबंधित कंपन्यांनी 9 बँकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे, त्यांची नावे प्रामुख्याने पुढीलप्रमाणे आहेत.

1. पंजाब नॅशनल बँक - 210 कोटींचा तोटा

2. बँक ऑफ बडोदा - 45.18 कोटींचा तोटा

3. बँक ऑफ इंडिया - 38.97 कोटींचा तोटा

4. कॅनरा बँक - 84.84 कोटींचा तोटा

5. IDBI बँक - 127.68 कोटींचा तोटा

6. युनियन बँक - 128.48 कोटींचा तोटा

7. SBI बँक - 44.66 कोटींचा तोटा

8. अॅक्सिस बँक – 39.30 कोटींचा तोटा

9. ICICI बँक - 121.72 कोटींचा तोटा

Mehul Choksi
Layoffs : आता आणखी एक कंपनी देणार 4000 कर्मचाऱ्यांना नारळ; वाचा काय आहे कारण?

एफआयआरमध्ये घोटाळ्याची रक्कम आणखी मोठी आहे आणि त्याच्याशी संबंधित यादी खूप मोठी आहे. भारतात हजारो कोटींचा बँक घोटाळा करून फरार झालेला मेहुल चोक्सी सध्या अँटिग्वामध्ये राहत आहे.

मात्र, त्याच्याविरुद्ध भारतीय तपास यंत्रणा सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या तपास अहवालाच्या आधारे भारत सरकार मेहुल चोक्सीला भारतात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()