LPG सबसिडीचे नियम बदलले; आता फक्त 'या' लोकांनाच मिळणार फायदा

LPG Cylinder
LPG Cylinderesakal
Updated on
Summary

महागाईला डोळ्यासमोर ठेवून एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घट करण्यात आलीय.

LPG Cylinder Subsidy : जुलै महिन्याच्या सुरुवातीला वाढत्या महागाईला डोळ्यासमोर ठेवून एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घट करण्यात आलीय. गॅस सिलिंडरचे दर कमी झाल्यानं नागरिकांनी आणि गृहिणींनी सुटकेचा नि:श्वास सोडलाय. त्याचबरोबर सरकारनं एलपीजी सिलिंडरवरील (LPG Cylinder) सबसिडीबाबत एक नवीन योजना तयार केलीय.

यामध्ये एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. ती म्हणजे, सरकारनं (Central Government) अंतर्गत मूल्यांकनात असं सूचित केलंय की, ग्राहक एका सिलिंडरसाठी १००० रुपये देण्यास सक्षम आहे. सिलिंडरवरील अनुदानाबाबत सरकार दोन भूमिका घेऊ शकतं. एक म्हणजे असं होऊ शकतं की, सरकार सबसिडीशिवाय सिलिंडरचा पुरवठा सुरू करते किंवा काही निवडक लोकांना अनुदानाचा लाभ देऊ शकते. सध्या देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत एलपीजी सिलिंडरची किंमत 1000 रुपये आहे, त्यावर 200 रुपये सबसिडी मिळते.

LPG Cylinder
Petrol-Price Today : पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये दिलासा; देशात आजचे दर काय?

सरकारची नेमकी योजना काय आहे?

अनुदानाबाबत सरकारकडून अद्याप कोणतंही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेलं नाही. या वृत्तावर विश्वास ठेवला तर सरकार १० लाख उत्पन्नाचा नियम लागू करणार असून उज्ज्वला योजनेच्या (Ujjawala Scheme) लाभार्थ्यांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहे. याशिवाय, इतर सर्व लोकांची सबसिडी संपुष्टात येऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.