पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट दिली आहे. केंद्रीय कर्मचार्यांसाठी महागाई भत्ता मूळ वेतनाच्या २८ टक्क्यांवरून ३१ टक्के करण्यात आला आहे. आणि तो १ जुलै २०२१ पासून लागू करण्यात येणार असल्याचं वित्त मंत्रालयाने सांगितलं.
अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या खर्च विभागाने (expenditure department) म्हटले आहे की, मूळ वेतन म्हणजे 7 व्या वेतन आयोगानुसार मिळणारे वेतन यात इतर कोणतेही विशेष वेतन किंवा भत्ता समाविष्ट नसेल. 25 ऑक्टोबर 2021 रोजी जारी केलेल्या परिपत्रकात केंद्र सरकारने यासंदर्भात माहिती दिली आहे. कर्मचाऱ्यांचा थकलेला महागाई भत्ता मूळ वेतनाच्या 28 टक्क्यांवरून 31 टक्क्यांपर्यंत वाढवला जाईल. तसेच 1 जुलै 2021 पासून हे ग्राह्य धरले जाईल, असे अर्थमंत्रालयाने स्पष्ट केले.
सशस्त्र दल-रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र आदेश जारी केला जाईल. डीएमधील ही वाढ संरक्षण सेवेतून पगार मिळवणाऱ्या नागरी कर्मचाऱ्यांनाही लागू होईल. त्याच वेळी, सशस्त्र दलातील कर्मचारी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्या जबाबदार मंत्रालये स्वतंत्र आदेश जारी करतील. केंद्रीय मंत्रिमंडळाने गेल्या आठवड्यात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता (DA) आणि पेन्शनधारकांसाठी महागाई सवलत (DR) मध्ये 3 टक्के वाढ करण्यास मंजुरी दिली होती.
सरकारी तिजोरीवर अतिरिक्त 9,488 कोटींचा बोजा
केंद्र सरकारच्या या निर्णयाचा थेट फायदा सुमारे 47.14 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 68.62 लाख पेन्शनधारकांना होणार आहे. या वर्षी जुलैमध्येच महागाई भत्त्याचा दर 17 टक्क्यांवरून 28 टक्के करण्यात आला होता. आता त्यात पुन्हा एकदा तीन टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा डीएचा दर 31 टक्क्यांवर गेला आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी अलीकडेच सांगितले होते की, महागाई भत्ता आणि महागाईच्या सवलतीमुळे सरकारी तिजोरीवर एकूण 9,488.70 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार येईल.
DA किती वाढणार?
जर तुमचा मूळ पगार 18,000 रुपये असेल, तर तुम्हाला सध्या 28 टक्के दराने 5,030 रुपये DA मिळत आहे. आता त्यात 3 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आता तुम्हाला 31 टक्के दराने 5,580 रुपये डीए मिळेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.