साडेसहा कोटींची जीएसटी चोरी; एका व्यक्तीला अटक

GST crime
GST crimesakal media
Updated on

मुंबई : साडेसहा कोटी रुपयांच्या करचोरी प्रकरणी केंद्रीय जीएसटी (central GST) व केंद्रीय सीमाशुल्क खात्याच्या (मुंबई सेंट्रल आयुक्तालय) अधिकाऱ्यांनी नुकतीच एका व्यक्तीस अटक (Arrest) केली. मे. एस. आर. एंटरप्राईझेस कडून सहा कोटी 46 लाख रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिट घेण्यात आले होते. याप्रकरणी खात्याचे अधिकारी तपास करीत असून त्यातच कंपनीच्या एका प्रोप्रारायटरला (Proprietor) अटक करण्यात आली आहे.

GST crime
मुंबई महापालिका निवडणुकीत नवा भिडू ; मतांचे गणित बिघडवणार

अस्तित्वात नसलेल्या बोगस कंपन्यांनी प्रत्यक्ष माल न देताच ही इनव्हॉईस जारी केल्याचे दाखविण्यात आले होते. तपास पूर्ण झाल्यावर ही करचोरीची रक्कम वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यासंदर्भात खबर मिळाल्यावर अधिकाऱ्यांनी तपास करून ही करचोरी उघड केली. या कंपनीने इनपुट टॅक्स क्रेडिट चुकीच्या पद्धतीने मिळविल्यावर ते दुसऱ्या कंपन्यांना दिले. यामुळे सरकारचा महसूल बुडाल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

यासंदर्भात या दोनही विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रोप्रायटरची कार्यालये व गोदामांची तपासणी केली. त्यानंतर त्या प्रोप्रायटरचा जाबजबाब घेतल्यावर शुक्रवारी त्याला अटक केली. त्याला फोर्ट च्या अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या गैरव्यवहारात अन्य कोणाचा हात होता याचा शोध घेतला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.