Budget 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले अर्थसंकल्पाचे तोंडभरुन कौतुक! म्हणाले...

eknath shinde
eknath shinde
Updated on

मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सितारामन यांनी मोदी सरकारचा शेटचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी विविध क्षेत्रातील कर आणि सवलतींबाबत अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. देशभरातून अर्थसंकल्पार प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोदी सरकारचे अभिनंदन केले आहे. 

एकानथ शिंदे म्हणाले, केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सितारामन यांनी आज संसदीय अर्थसंकल्पीय अधिवेशनात देशाचा वार्षिक अर्थसंकल्प सादर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने 'सबका साथ, सबका विकास' या घोषणेनुसार अर्थसंकल्पात समाजातील प्रत्येक घटकाला दिलासा मिळाला आहे.

गरिबांना आधार, मध्यमवर्गीयांना दिलासा, उद्योगांना उभारी आणि पायाभूत सुविधांना उत्तेजन देणारा हा अर्थसंकल्प आहे. रोजगार निर्मिती, शेतकरी, कामगार, महिला, युवक अशा सर्व घटकांना न्याय देणारा हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प असून या अर्थसंकल्पाचे मी मनापासून स्वागत करतो. देशाच्या आणि राज्याच्या सर्वांगिण विकासाला या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून चालना मिळणार असल्याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच अर्थमंत्री श्रीमती निर्मला सितारामन यांचे मनापासून अभिनंदन करतो, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

eknath shinde
Union Budget 2023: "अर्थसंकल्पात महाराष्ट्राला भोपळा; निवडणुका नाहीत म्हणून तोंडाला पुसली पानं"

निर्मला सीतारामन यांनी कर कपातीसह अनेक मोठ्या घोषणा केल्या. आता ७ लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही. एवढेच नाही तर निर्मला सीतारामन यांनी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठी भेट दिली. महिला सन्मान बचत पत्र योजना सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. 

eknath shinde
Union Budget 2023: बजेट गरिबांच स्वप्न पुर्ण करणार; PM मोदींनी व्यक्त केला विश्वास

याशिवाय शेतकरी, तरुण आणि विद्यार्थ्यांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या. निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प कसा असेल. निर्मला सीतारामन यांनी राष्ट्रीय पातळीवर मोठ्या घोषणा केल्या. 

eknath shinde
Gulmarg Avalanche : गुलमर्गमध्ये भीषण हिमस्खलन; दोन परदेशी नागरिकांचा मृत्यू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.