मायक्रोसॉफ्ट कंपनीने गुरुवारी मोठी घोषणा केली आहे. चीनमधील सोशल नेटवर्किंग अॅप लिंक्डइनची वेबसाईट बंद करणार असल्याची घोषणा मायक्रोसॉफ्टने केली आहे. लिंक्डइन हा अमेरिकेतून कार्यरत असलेला शेवटचा मोठा सोशल नेटवर्क प्लॅटफॉर्म आहे.
लिंक्डइन 2014 मध्ये चीनमध्ये लॉन्च करण्यात आले. काही मर्यादित वैशिष्ट्यांसह ते लॉन्च करण्यात आले. यासाठी लिंक्डइनची विशेष वेबसाईट लॉन्च करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय कंपन्यांना चीनमधील इंटरनेटच्या कडक नियमांचे पालन करण्यासाठी नियम लागू होतात. या नियमांचे पालन करण्यासाठी लिंक्डइनचे विशेष व्हर्जन चीनमध्ये कार्यरत होते.
काय म्हणाली मायक्रोसॉफ्ट?
मायक्रोसॉफ्टने यानंतर परिपत्रक जारी केले. चीनमधील आव्हानात्मक ऑपरेटिंग परिस्थिती आणि जाचक अटींमुळे कंपनी बंद करण्यात आल्याची माहिती मायक्रोसॉफ्टने दिली. मात्र, चीनमध्ये जॉब सर्च वेबसाईट सुरू कऱण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मायक्रोसॉफ्टने दिली. यामध्ये लिंक्डइनचे सोशल नेटवर्किंग फिचर नसेल.
चीनमध्ये फेसबुकपासून स्नॅपचॅटपर्यंत जवळपास सर्व प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी आहे. अगदी चीनने गुगल सर्चवर बंदी घातली आहे. त्याच्या जागी चीनने स्वतःचे सोशल मीडिया वर्ल्ड विकसित केले आहे.
चीनमधील 'हे' प्लॅटफॉर्म जोरात
चीनमध्ये व्हॉट्सअॅपऐवजी वे-चॅट, फेसबुक-ट्विटरऐवजी सिना वेइबो, गुगलऐवजी बायडू टिबा, मेसेंजरऐवजी टेन्सेन्ट क्यूक्यू आणि यूट्यूबऐवजी यूकू टूडो आणि टेन्सेन्ट व्हिडीओ सारखे प्लॅटफॉर्म वापरले जातात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.