नवी दिल्ली : कोळशाच्या किमतीत वाढ करण्याचे संकेत खाण क्षेत्रातील सार्वजनिक कंपनी कोल इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष प्रमोद अग्रवाल यांनी दिले आहेत. कंपनीचा वाढलेला उत्पादन खर्च, कर्मचाऱ्यांचे वेतन यामुळे कंपनीकडून उत्पादनांच्या किमतीत कमीत कमी १० टक्के वृद्धी केली जाऊ शकते. कंपनीने २०१८ मध्ये कोळशाच्या किमतीत शेवटची वाढ केली होती.
इंधनपुरवठा करारांतर्गत मागील काही वर्षांपासून कोळशाच्या किमतीत कोणतीही वाढ करण्यात आली नाही. कर्मचाऱ्यांच्या वेतनातील बदलांमुळे उत्पादन किमतीत वाढ होत आहे. त्यामुळे कंपनीकडून कोळशाच्या किमतीत कमीत कमी १० - ११ टक्कांची वाढ केली जाऊ शकते. या प्रकरणी कोल इंडियाने समिती सदस्यांशी अनौपचारिक चर्चा केल्याची माहिती आहे. कोल इंडियाच्या समिती सदस्यांपैकी अधिकतर सदस्यांनी कोळशाच्या किमतीत वाढ करण्याची आवश्यकता मान्य केली आहे.
यापूर्वी कोल इंडियाचे अध्यक्ष प्रमोद अग्रवाल यांनी नुकतेच सांगितले होते की, कंपनीचा उत्पादन खर्च वाढला आहे. त्यामुळे किमतीत वाढ होऊ शकते.कोळशाच्या किमतीत वाढ करण्यावर विचार करत असल्याचेही ते म्हणाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.