नवी दिल्ली : कोरोना महासंकटानंतर काही बँकांनी एटीएमला स्पर्श न करता कॅश काढण्याची सुविधा आणली होती. मात्र, ही सुविधा संपूर्णपणे संपर्करहित नव्हती. मात्र आता मास्टरकार्डने आता पूर्णपणे संपर्करहित कॅश विथड्रॉल करण्यासाठी AGS Transact Technologies सोबत भागीदारी केली आहे. एटीएम कार्डधारक आता एटीएमच्या स्क्रीन आणि बटनाला स्पर्श न करत पैसे काढू शकतात. यासाठी ग्राहकांना फक्त स्क्रीनवरील क्यूआर कोड स्कॅन करावा लागेल.
AGS Transact Technologies, AGSTTL नावाच्या एका कंपनीने एक नवे सॉफ्टवेअर बनवलं आहे. ज्याच्या मदतीने कुणीही व्यक्ती एटीएमला स्पर्ष न करता पैसे काढू शकते. AGS Transact Technologies, AGSTTL ग्रुपचे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर महेश पटेल यांनी म्हटलं की, आम्ही विनास्पर्ष पैसे काढण्याचा उपाय शोधला आहे. मास्टरकार्ड नेटवर्कचा उपयोग करणारे बँक आपल्या ग्राहकांसाठी याचा वापर करण्यासाठी कंपनीची मदत घेऊ शकतात.
ATM ला स्पर्श करण्याव्यतिरिक्त काढा पैसे
- यासाठी सर्वांत आधी स्मार्टफोनवर बँकेच्या मोबाईल एप्लिकेशनला उघडा आणि क्यूआर विड्रॉवलच्या ऑप्शनवर क्लिक करा.
- त्यानंतर जेवढे पैसे काढायचे आहेत, ती अमाउंट फोनवर टाका
- त्यानंतर एटीएमवर दिसणाऱ्या QR कोडला स्कॅन करा
- आता Proceed बटनावर क्लिक करुन कन्फर्म करा.
- आता आपले 4 डिजीट पिन टाका
- त्यानंतर आपल्याला ATM मधून कॅश मिळेल.
पटेल यांनी म्हटलं की, विनास्पर्श विथड्रॉल केवळ महामारीच्या दरम्यान मदत करत नाही तर एटीएमसंबंधित गुन्ह्यांना कमी करण्यासाठी देखील मदत करतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.