बांधकाम साहित्याचे दर वाढल्याचा परिणाम; क्रेडाईचा अंदाज

घरे २० टक्क्यांनी महागणार?
credai
credaisakal
Updated on

मुंबई : बांधकाम साहित्याच्या(Construction materials) वाढत्या किमतींचा परिणाम देशातील घरांच्या किमतीवर होणार आहे. त्यामुळे जवळपास ६० टक्के विकसकांनी घरांच्या किमतींमध्ये २० टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. विकसकांच्या क्रेडाई(credai) संघटनेने जारी केलेल्या अहवालातून ही माहिती पुढे आली आहे.क्रेडाई संघटनेने वार्षिक स्थावर मालमत्ता विकासक अभिप्राय सर्वेक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले.

देशातील दिल्ली, अहमदाबाद, बेंगळुरू चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, मुंबई महानगर आणि पुणे या शहरांसह २१ राज्यांमधील विकसकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये एक हजार ३२२ विकसकांकडून २०२२ या वर्षात नवे प्रकल्प सादर करण्याच्या योजना, तंत्रज्ञानाचा अवलंब, ऑनलाईन विक्रीचे योगदान, नवीन मालमत्ता वर्ग, सरकारकडून अपेक्षा, तंत्रज्ञानाचा अवलंब आदी विषयी मते जाणून घेण्यात आली. त्यापैकी ६० टक्के विकसकांनी बांधकाम साहित्याच्या वाढत्या किमतीमुळे घरांच्या किमतीमध्ये वाढ होईल, असे मत व्यक्त केले आहे.

credai
हरिभाऊ बागडेंसह माजी संचालकांसाठी एकवटले सर्व पक्ष, प्रचार थांबला

ऑनलाईन व्यवसायात २५ टक्के वाढ

क्रेडाईच्या अहवालातून(credai survey ) बांधकाम क्षेत्राची इतर माहितीही समोर आली आहे. त्यानुसार २०२२ मध्ये ऑनलाईन विक्री व्यवसायात २५ टक्के पर्यंत वाढ होण्याची शक्यता अहवालात वर्तविण्यात आली आहे. २०२२ मध्ये ९६ टक्के विकसकांचे निवासी स्थावर मालमत्ता प्रकल्प लाँच करण्यास प्राधान्य देणार आहेत, तर ६५ विकसक सहकारी, व्यावसायिक मॉडेलचे जाहीर करण्यास इच्छुक आहेत.

विकसकांपुढे अडचणी

गेल्या वर्षीपासून बांधकाम साहित्याच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. किमतींवर नियंत्रण आणावे अशी मागणी विकसकांच्या संघटनांनी केंद्र सरकारकडे(central government ) केली आहे; मात्र त्यावर अद्याप तोडगा निघू न शकल्याने विकासकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. देशातील विकसकांनी क्रेडाईच्या सर्वेक्षणात या प्रश्नाकडे पुन्हा लक्ष वेधले आहे.

credai
सर्कलमुळे इच्छादेवी चौक बनला धोकादायक

अहवालात विकसक समुदायाचे प्रमुख मुद्दे अधोरेखित केलेले आहेत. त्यात कच्च्या सामुग्रीचा खर्च नियंत्रित करणे, जीएसटीवर क्रेडिट(gst credit) माहिती सादर करणे, निधीची उपलब्धता वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

- हर्षवर्धन पटोडिया,

राष्ट्रीय अध्यक्ष, क्रेडाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.