Credit Score : कर्ज मिळावताना अडचणी येतायेत? असा सुधारा तुमचा क्रेडीट स्कोअर

कर्ज देताना कोणतीही बँक पहिले तुमचा क्रेडीट स्कोअर चेक करते. त्यामुळे क्रेडीट स्कोअर सुधारण्यासाठी काही टिप्स
Credit Score
Credit Scoreesakal
Updated on

How To Improve Credit Score : कोणतेही कर्ज मिळवताना तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असणं आवश्यक आहे. शिवाय हो स्कोअर ७५० पेक्षा कमी असेल तर क्रेडीट कार्ड मध्येही अडचणी येऊ शकतात. पण या स्कोअरमध्ये सुधार केला जाऊ शकतो. जाणून घ्या कसा.

याद्वारे सुधारता येत क्रेडीट स्कोअर

वेळेवर हप्ते भरा

घेतलेल्या कर्जाचे हप्ते वेळच्या वेळी न भरणे ही मोठी चुक ठरू शकते. त्यामुळे हप्ते वेळच्या वेळी भरणे आवश्यक आहे. जेव्हा उशीर होतो तेव्हा फक्त पेनल्टीच लागत नाही तर क्रेडीट स्कोअर ही कमी होतो.

क्रेडीट रिपोर्टमध्ये काय कमतरता आहे ते तपासा

तुमचा क्रेडीट रेकॉर्ड चांगला असू शकतो. पण त्यात बऱ्याच अशा कमतरता असू शकतात ज्यांच्या विषयी तुम्हाला माहित नाही. त्यामुळे तुमचा क्रेडीट स्कोअर कमी होऊ शकतो.

Credit Score
Bank Privatisation: आता 'ही' सरकारी बँक विकली जाणार; सरकारने सांगितला प्लॅन

एक चांगला क्रेडीट बॅलंस बनवण्याचा प्रयत्न करा

क्रेडीट कार्ड, पर्सनल लोन, ऑटो लोन, होम लोन या सारखे सुरक्षित लोन आणि असुरक्षित लोन याचा योग्य ताळमेळ साधा. सुरक्षित लोनची संख्या अधिक असणाऱ्यांना कर्ज देणं बँका पसंत करतात आणि क्रेडीट रेटींग देतात. जर असुरक्षित कर्ज आणि सुरक्षित कर्ज यात असुरक्षित कर्जाचं प्रमाण अधिक असेल तर आधी ते कर्ज फेडणे आवश्यक आहे.

Credit Score
Bank Account : RBI ने बँक खात्याशी संबंधित बदलले नियम; खातेधारकांना करावे लागणार 'हे' महत्वाचे काम

थकबाकी ठेऊ नका

क्रेडीट स्कोअर वाढवण्यासाठी थकबाकी संपवणं फार आवश्यक आहे. या सोबतच क्रेडीट स्कोअर कसा सुधारावा यासाठी प्रयत्न करावे.

जॉइंट अकाउंट होल्डर नसावा

शक्यातो जॉइंट अकाउंटवर किंवा गॅरेंटरवर लोन घेणं टाळावं. यात जर दुसऱ्याकडून काही डीफॉल्ट झाला तर त्याचा तुमच्या क्रेडीट स्कोअरवर परिणाम होतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()