चीनने आपल्या वित्तीय संस्था आणि पेमेंट कंपन्यांना क्रिप्टोकरन्सी व्यवहाराशी संबंधित सेवा पुरविण्यास बंदी घातल्यानंतर क्रिप्टो मार्केटमध्ये मोठी पडझड झालेली पाहायला मिळाली. मात्र आजच्या सत्रात क्रिप्टोकरन्सी मार्केट पुन्हा एकदा सावरताना पाहायला मिळत आहे. जगभरात सर्वाधित ट्रेड केली जाणारी आणि सर्वात लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी बिटकॉइनसह आज सर्व आभासी चलने म्हणजेच क्रिप्टोकरन्सीच्या किंमती पुन्हा एकदा वधारलेल्या पाहायला मिळतायत.
क्रिप्टो मार्केटमध्ये जगभरातील टॉप १० क्रिप्टोकरन्सी हिरव्या चिन्हासह ट्रेड करताना पाहायला मिळतायत. अशात आज बिनान्स (Binance), पोल्काडॉट (Polkadot) आणि डोजकॉईन (Dogecoin) आजच्या दिवसातले टॉप गेनर्स म्हणून पुढे येत आहेत.
बिनान्स कॉईनच्या किमतीत आज 10.10% तेजी पाहायला मिळाली. दुपारी 2.30 वाजता ही करन्सी 418.05 डॉलरवर ट्रेड करत होती. तर दुरीकडे भारतातही प्रचंड प्रसिद्ध अशी डोजकॉईन देखील आज 8.73% वधारलेली पाहायला मिळतेय.
आज बिटकॉईनच्या किमती देखील वधारल्यात. खरंतर गेल्या चोवीस तासांमध्ये बिटकॉईनच्या किमती 3.65% टक्के वाढल्याचं पाहायला मिळालं आहे. बिटकॉईन सध्या तेजीत आहे आणि 38 हजार 846.46 डॉलरवर ट्रेड करताना पाहायला मिळालं.
तर दुरीकडे इथेरियम याही क्रिप्टोमध्ये तेजी पाहायला मिळतेय. इथेरियममध्ये 4.06% तेजी पाहायला मिळाली. इथेरियम 2840.76 डॉलरवर ट्रेड करत होता.
आज थेथर (Tether) या क्रिप्टोचा भाव 1 डॉलर होता. कार्डानो (Cardano) चा आजचा भाव 1.79 डॉलरवर ट्रेड करत होता.
आज एक्सपीएस (XRP) 1.2% च्या तेजीसोबत 1.04 डॉलरवर ट्रेड करत होता
पोल्काडॉट (Polkadot) आज 14.41% च्या तेजीसह 27.81 डॉलरवर ट्रेड करत होता
बिटकॉईन कॅश (Bitcoin Cash) या क्रिप्टोत आज 3.33% तेजी पाहायला मिळाली. आज हा काउंटर 727.22 डॉलरवर ट्रेड करताना पाहायला मिळाला
तर डोजकॉईन किलर या नावाने प्रसिद्ध अशा शिबा इनु (Shiba Inu) कोईनमध्ये आज 9.71% तेजी पाहायला मिळाली
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.