रशिया-युक्रेनच्या युद्धातही क्रिप्टो बाजार तेजीत; तब्बल 11 टक्क्यांची वाढ

रशियाने युक्रेनविरोधात युद्धाची घोषणा केल्यानंतर क्रिप्टो बाजारपेठेत मोठी घसरण पाहण्यास मिळाली होती.
Bitcoin
BitcoinSakal
Updated on

Ukraine Russia War : रशियाने युक्रेनविरोधात युद्धाची घोषणा केल्यानंतर जागतिक क्रिप्टोकरन्सीमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती. त्यानंतर क्रिप्टो बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती. त्यामुळे क्रिप्टोमधील गुतवणुकदार चिंतेत पडले होते. दरम्यान, शुक्रवारी क्रिप्टोच्या दरामध्ये चांगली वाढ पाहण्यास मिळाली असून यामध्ये 11 टक्क्यांनी वाढ पाहण्यास मिळाली आहे. (Crypto Currency In Green After Ukraine Russia War)

Bitcoin
शिवसेनेकडून पलटवार? नील सोमय्यांची अटकपूर्व जामीनासाठी धाव

जगात सर्वाधित लोकप्रिय असलेल्या बिटकॉईनमध्ये (Bitcoin) शुक्रवारी 11 टक्क्यांहून अधिकची वाढ पाहण्यास मिळाली मात्र, ते अद्यापही 40,000 डॉलर मार्कच्या खालीच पाहण्यास मिळत आहे. तर इथरियममध्ये 9 टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली असून, XRP च्या किंमतीत 7 टक्क्यांहून अधिक वाढ पाहण्यास मिळाली. टेरामध्ये 20 टक्के, सोलाना 14 टक्के तर, कार्डानोच्या किंमतीमध्ये 11 टक्क्यांहून अधिकची वाढ झाल्याचे सकारात्मक चित्र पाहण्यास मिळाले. याशिवाय इतर लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी म्हणजेच पोल्काडॉट 7 टक्क्याहून अधिक, डॉजकॉइनमध्ये 5 टक्क्यांहून अधिक, तर पॉलीगॉनमध्ये 9 टक्क्यांहून अधिक आणि शिबा इनूने 5 टक्क्यांहून अधिकची वाढ नोंदवली गेली.

Bitcoin
Ukraine Russia War : 'गंगा' अंतर्गत 24 तासात 4 हजार भारतीय मायदेशी

दरम्यान, रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर क्रिप्टो बाजारपेठ (Investment In Crypto) 34,932.07 डॉलरपर्यंत म्हणजेच 8 टक्क्यांची घसरण झाली होती. त्यानंतर क्रिप्टोमधील गुंतवणूकदार मोठ्या चिंतेत पडले होते. परंतु, शुक्रवारी क्रिप्टोमध्ये वाढ नोंदविण्यात आली असून आता क्रिप्टोची बाजारपेठ 38,816.10 डॉलरवर पोहोचली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()