Mutual Fund मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; उद्यापासून लागू होणार नवीन नियम

Mutual fund
Mutual fund
Updated on

नवी दिल्ली: भारतीय शेअर बाजारातील नियामक संस्था 'सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने' (SEBI) इक्विटी म्युच्युअल फंडाच्या खरेदी-विक्रीची वेळ बदलून 3 वाजेपर्यंत केली आहे. आता या बदलानंतर गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडच्या खरेदी आणि विक्रीसाठी अधिक वेळ मिळणार आहे. तर दुसऱ्या बाजूला debt schemes आणि conservative hybrid fund खरेदीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

19 ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम-
म्युच्युअल फंडांच्या खरेदी-विक्रीचे हे नवे वेळापत्रक 19 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. सेबीच्या या निर्णयाचा तपशील देताना असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (AMFI) संस्थेचे अध्यक्ष नीलेश शहा यांनी ट्विट करुन इक्विटी म्युच्युअल फंडांच्या कटऑफ टायमिंगमध्ये बदल करण्यात आल्याची माहिती दिली आहे. 

इक्विटी म्युच्युअल फंडाच्या सर्व योजनांना नवीन नियम लागू-
नीलेश शहा यांनी ट्विट करत माहिती दिली आहे की, ' debt schemes आणि conservative hybrid fund वगळता बाकी सर्व म्युच्युअल फंडच्या खरेदी आणि विक्रीसाठी कट ऑफ वेळ 3 पर्यंत वाढवली आहे. इक्विटी म्युच्युअल फंडांच्या सर्व योजनांना हा नवीन नियम लागू असेल.'

पण सेबीच्या पुढील आदेशापर्यंत debt schemes आणि conservative hybrid फंडाच्या खरेदी आणि विक्रीची वेळ बदलली जाणार नाही. काही दिवसांपुर्वीच सेबीने कट ऑफची वेळ बदलून दुपारी 12.30 पर्यंत केली होती. आता पुन्हा पहिल्यासारखाच कट ऑफचा टायमिंग केला आहे. गुंतवणूकदारांना याचा फायदा त्या दिवसाची एनएव्ही (Net Asset Value) मिळवण्यासाठी अधिक वेळ मिळेल.

एप्रिलमध्ये कट ऑफ वेळेत बदल केला होता-
सेबीने एप्रिलमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे म्युच्युअल फंड युनिट्सच्या खरेदी-विक्रीसाठीची कट ऑफ वेळ कमी केली होती. त्यात लिक्विड आणि ऑव्हरनाईट योजनांचाही समावेश होता. लिक्विड आणि ओव्हरनाईट फंड खरेदी करण्याची आणि विक्रीची वेळ 12.30 ते 1.30 पर्यंत आहे. तर  debt schemes आणि conservative hybrid फंडाच्या खरेदी आणि विक्रीची वेळ 1 आहे.

(edited by- pramod sarawale)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.