Bank FD Rate : खुशखबर! 'या' दोन बँकांच्या FD दरात वाढ, जाणून घ्या नवीन दर

बँकांनी त्यांच्या मुदत ठेवींच्या व्याजदरात वाढ केली आहे.
FD Interest Rate
FD Interest Ratesakal
Updated on

FD Rates : भारतासह संपूर्ण जगात या वर्षी महागाई झपाट्याने वाढली आहे. अशा स्थितीत जगभरातील मध्यवर्ती बँकांनी त्यांचे व्याजदर झपाट्याने वाढवले ​​आहेत. रिझव्‍‌र्ह बँकेनेही यंदा पाच वेळा व्याजदर वाढवले ​​आहेत. या वर्षी रेपो दर 4.00 टक्क्यांवरून 6.25 टक्क्यांवर पोहोचला आहे.

या वाढीचा फटका बँकेच्या ग्राहकांनाही बसला आहे. अनेक बँकांनी त्यांचे व्याजदर वाढवले ​​आहेत. आता या यादीत आणखी दोन बँकांची नावे समाविष्ट झाली आहेत. या स्मॉल फायनान्स बँकांमध्ये सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक आणि DCB बँक आहेत. या दोन्ही बँकांनी त्यांच्या मुदत ठेवींच्या व्याजदरात वाढ केली आहे.

दोन्ही बँकांनी व्याजदरात किती वाढ केली आहे आणि ग्राहकांना कोणत्या कालावधीसाठी किती व्याज मिळत आहे ते जाणून घेऊया.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकने त्यांच्या 2 कोटींपेक्षा कमी असलेल्या एफडीवरील व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेचे नवीन दर 21 डिसेंबर 2022 पासून लागू झाले आहेत. व्याजदरात वाढ झाल्यानंतर, बँक सामान्य नागरिकांना 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या एफडीवर 4.00 टक्के ते 6.00 टक्के दराने व्याज देत आहे.

त्याच वेळी, बँक ज्येष्ठ नागरिकांना 4.50 टक्के ते 6.50 टक्के व्याजदर देत आहे. बँक 999 दिवसांच्या FD वर जास्तीत जास्त व्याज दर देत आहे. बँक या कालावधीत सर्वसामान्य नागरिकांना 8.51 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 8.76 टक्के व्याजदर देत आहे.

  • 1 वर्ष ते 1 वर्ष 6 महिने FD – 7.00 टक्के

  • 1 वर्ष 6 महिने ते 2 वर्षांपर्यंत FD – 8.01 टक्के

  • 2 वर्षापासून 998 दिवसांपर्यंत FD - 7.51 टक्के

  • 5 वर्षांपर्यंत FD - 6.75 टक्के

  • 5 ते 10 वर्षे FD - 6.00 टक्के

डीसीबी बँकेचे एफडीच दर :

DCB बँक (DCB Bank FD Rates) ने त्यांच्या 2 कोटींपेक्षा कमी FD वर व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेचे नवीन दर 21 डिसेंबर 2022 पासून लागू झाले आहेत. बँक आपल्या सामान्य नागरिकांना 3.75 टक्के ते 7.60 टक्के व्याजदर देत आहे.

बँक ज्येष्ठ नागरिकांना 4.25 टक्के ते 8.10 टक्के व्याजदर देत आहे. बँक सामान्य नागरिकांना कमाल 7.85 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 8.35 टक्के व्याजदर देत आहे.

FD Interest Rate
Share Market : मंदीतही गुंतवणूकदारांची चांदी! 'या' शेअरने केले मालामाल, तुमच्याकडे आहे का शेअर?
  • 6 महिने ते 12 महिने FD - 6.25%

  • 12 महिने ते 18 महिने - 7.25%

  • 18 महिने ते 700 दिवस FD – 7.50%

  • 700 दिवसांपासून 36 महिन्यांपर्यंत FD - 7.85 टक्के

  • 36 महिने ते 120 महिने FD – 7.60 टक्के

RBI व्याजदरात वाढ :

7 डिसेंबर 2022 रोजी झालेल्या बैठकीत रिझर्व्ह बँकेने रेपो दर वाढवण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर आता रेपो रेट 6.25 टक्क्यांवर पोहोचला आहे. या वाढीपासून अनेक बँकांनी त्यांचे व्याजदर वाढवले ​​आहेत. या बँकेत पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, येस बँक, अॅक्सिस बँक इत्यादी अनेक बँकांची नावे समाविष्ट आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.