पुणे: डेकालीप टेक्नॉलॉजी या स्टार्टअप कंपनीने नवीन प्रयोग करत आगीपासून बचावासाठी नवीन अग्निसुरक्षा उत्पादने बाजारात आणली आहेत. कंपनीने लागलेल्या आगीला थोपवण्यासाठी 'थ्रो' आणि 'एफ-प्रोटेक्ट' विकसित केली आहेत. थ्रो हे अत्यंत उत्तमरित्या डिझाइन केलेले पेपरवेट किंवा फुलदाणीच्या आकाराचे उत्पादन आहे. ते घरात, कार्यालयात, हॉटेल्स इत्यादी ठिकाणी ठेवता येईल तर एफ-प्रोटेक्ट हे गाडीच्या बॉनेटखाली ठेवण्यात येते, जेणेकरून गाडीतील इंजिनाला आग लागून होणारे अपघात टाळता येतील. ही उत्पादने सुरक्षित आणि माणसांसाठी निरूपद्रवी तसेच आगीच्या नियंत्रणासाठी उपयोगी ठरणार आहे.
''भारतासारख्या देशामध्ये दररोज आगीमुळे होरपळून 62 लोकांना जीव गमवावा लागतो. म्हणजेच गेल्या पाच वर्षात लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. माणसांच्या चुकीमुळे, तांत्रिक कारणांमुळे आग कुठेही लागू शकते. अगदी घर, ऑफिस किंवा एखाद्या मोठ्या कारखान्यामध्ये अशावेळी 'थ्रो' हे लागलेली आग नियंत्रणात आणण्यासाठी अगदी उपयोगी ठरणार आहे. उत्पादनात वापरण्यात आलेली बिनविषारी रसायने ऑक्सिजन पुरवठा तोडतात आणि आग आणखी पसरण्यापासून प्रतिबंध करतात. एफ प्रोटेक्ट हे भारतातील पहिले स्वयंचलित इंजिन अग्निशामक आहे. हे उत्पादन गाडीच्या बॉनेटखाली बसते आणि इंजिनाला आग लागल्यास आपोआप अॅक्टिव्हेट होणाऱ्या स्मार्ट हीट तंत्रज्ञानाने कार्यरत होते आणि आग पूर्णपणे विझवते. त्यामुळे आग आणखी पसरत नाही आणि जीवित तसेच मालमत्तेला कोणत्याही प्रकारचा धोका पोचत नाही. ,'' असे डेकालीप टेक्नॉलॉजीजचे समूह अध्यक्ष अनिर्बन सरकार यांनी सांगितले. यावेळी डेकालीप टेक्नॉलॉजीजचे व्यवस्थापकीय संचालक राजीव मित्रा देखील उपस्थित होते.
'सध्या सरकार अग्निसुरक्षा संबंधित उत्पादनांवर 18 टक्के जीएसटी आकारते. त्यामुळे अग्निसुरक्षा संबंधित उत्पादनांच्या किंमती बाजारात जास्त आहेत. त्यामुळे आता जीएसटी कमी करण्यासाठी सरकारला विंनती करणार आहोत. आगीमुळे जीवित आणि वित्त हानी मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे सुरक्षेसंबंधित उपकरणे स्वस्त व्हावी यासाठी जीएसटी कमी होणे आवश्यक आहे.'' असेही अनिर्बन सरकार यांनी सांगितले. सध्या बाजारात एफ-प्रोटेक्ट 10,500 रुपयांना तर 4 थ्रो उत्पादनांचा पॅक भारतात 1770 रूपये (कर वगळून) उपलब्ध करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.