'एआय'द्वारे आजाराचे अचूक निदान करणारी डीपटेक

DeepTek
DeepTekSakal
Updated on

आरोग्यसेवा क्षेत्रात कृत्रिम बुध्दिमत्ता किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) हे तंत्रज्ञान मोठे परिवर्तन घडून आणत आहे. आरोग्यसेवेतील वाढत्या आव्हानांमुळे कृत्रिम बुध्दिमत्तेला या क्षेत्रात अनेक संधी खुल्या होत आहेत. क्षयरोग, कोव्हिड-१९ सारख्या आजारांचे एआयद्वारे अचूक निदान करीत रेडिओलाॅजिस्टचा वेळ वाचवून मदत करणाऱ्या पुणेस्थित डीपटेक या स्टार्टअप (Deeptek Startup) कंपनीने आरोग्यक्षेत्रात भरारी घेतली आहे.

अजित पाटील आणि अमित खरात यांनी २०१७ मध्ये डीपटेक या कंपनीची संयुक्तपणे स्थापना केली. पाटील यांनी एसएसपीएमएसमधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले,तर १९९२ मध्ये सीओईपीमधून आपले अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी आयआयटी खरगपूर येथून इंडस्ट्रीयल इंजिनीअरिंग आणि ऑपरेशन रिसर्च या विषयात पदव्युत्तर शिक्षण प्राप्त केले.अमित खरात यांनी रेडिओलॉजीमध्ये डीएनबी आणि पीएचडी मिळविली असून गेल्या १७ वर्षांपासून रेडिओलॉजी स्पेस क्षेत्रात कार्यरत आहेत. (Deeptek startup helps to find accurate cause of disease through AI)

मूळचे सांगली जिल्ह्यातील असलेले अजित पाटील यांनी उद्योजकतेचे पहिले धडे हे त्यांच्या वडिलांकडून घेतले, त्यावेळी वडिलांचे मॅन्युफॅक्चरिंग वर्कशॉप होते. अजित पाटील यांनी एक - दोन कंपन्यांमध्ये नोकरी देखील केली, मात्र आपल्याला व्यवसायच करायचा आहे हे त्यांनी ठरविले होते. (Startup News)

नव्वदीच्या दशकात सॉफ्टवेअर उद्योगाचा मोठा विस्तार होणार असून भारतात परिवर्तन घडणार याची अजित पाटील यांना जाणीव झाली होती,त्यामुळे सॉफ्टवेअर उद्योगाचा अनुभव घेण्यासाठी ते एका बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत रुजू झाले. मात्र कालांतराने भारतात परतून सॉफ्टवेअर क्षेत्रात काहीतरी करायचे आहे असे त्यांनी वडिलांना सांगितले. वडील मेकॅनिकल इंजिनिअरींग क्षेत्रात असूनही व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यामुळे आत्मविश्वास अधिक वाढला. त्यांनी व्हरटेक्स सॉफ्टवेअर ही कंपनी सुरू केली, जी जपानमधील सॉफ्टवेअर संगणक सेवांवर लक्ष्य केंद्रित करणारी कंपनी होती, ज्यामध्ये मित्सुई आणि एनटीटी डाटा या कंपनीने गुंतवणूक केली होती.

अजित पाटील यांनी २०१३ मध्ये बाहेर पडून काहीतरी नवीन करायचे ठरविले. २०१७ मध्ये एनटीटी डाटा या कंपनीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (सीटीओ) शोशी किटानी यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी रेडिओलॉजी 'एआय'मध्ये आपली रूची व्यक्त केली. त्यांच्याकडे असे उत्पादन होते जे अमेरिकेतील १००० हॉस्पिटल्समध्ये वापरले जात होते. कृत्रिम बुध्दिमत्तेमध्ये माहितीसाठा किंवा डाटाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि याच डाटा शिवाय कृत्रिम बुध्दिमत्ता शक्य नाही. किटानी त्यांच्याशी झालेल्या संवादानंतर अजित पाटील यांनी यावर संशोधन सुरू केले. त्यानंतर ते अमित खरात यांना भेटले आणि सहसंस्थापक होण्यासाठी आग्रह धरला.

त्यावेळी सीओईपीमधून पदवी प्राप्त केलेल्या व डाटा सायंटिस्ट असलेले अनिरूध्द पंत देखील या स्टार्टपशी जोडले गेले. हे तिघेही अमेरिकेत रेडिओलॉजी सोसायटी ऑफ अमेरिकेने आयोजित केलेले प्रदर्शन पाहायला गेले. त्यावेळेस कृत्रिम बुध्दिमत्ता क्षेत्रात काम करणार्‍या कंपनींशी संवाद साधला व त्या नेमका काय काम करतात हे जााणून घेतले.

एकंदर त्यांना लक्षात आले की, या क्षेत्रात परिपूणर्ण सेवा देण्यासाठी फक्त कृत्रिम बुध्दिमत्ता नव्हे तर त्याचबरोबर रेडिओलॉजिस्टची देखील गरज आहे. या प्रारूपानुसार कंपनीने आपले कामकाज सुरू केले आणि ही कार्यपध्दती घेऊन एनटीटी डाटाशी संवाद साधला. एनटीटी डाटाला हे प्रारूप आवडले आणि २०१८ मध्ये त्यांनी 'डीपटेक'मध्ये गुंतवणूक करायचा निर्णय घेतला. त्याचबरोबर मित्सुई समूहाच्या नोबोरी या कंपनीने देखील गुंतवणूक करायचे ठरविले. आज डीपटेककडे १०० तज्ज्ञ लोकांची टीम आहे, ज्यामध्ये ५० रेडिओलॉजिस्ट व ४० तंत्रज्ञ आहेत. (Start up In Maharashtra)

रेडिओलॉजी व आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय?

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) हे प्रतिमा विश्‍लेषणाचे एक ताकदवर साधन आहे. तर दुसरीकडे रेडिओलॉजी मुळे एमआरआय सीटी स्कॅन, एक्सरे यातून मिळालेल्या प्रतिमांचे विश्‍लेषण होते. या प्रतिमांचे अचूक विश्लेषण करून रोग किंवा संसर्ग किती वाढला आहे, हे रेडिओलॉजी एआय द्वारे कळू शकते. वापरण्यात येणारे प्रत्येक मशीन आणि यंत्रणा वेगळी असते आणि प्रत्येक मानवी शरीरही वेगळे असते. याशिवाय रेडिओलॉजिस्टची संख्या देखील बहुतांश देशांमध्ये कमी आहे. त्यामुळे विविध मशीन्स, त्यांच्या विविध यंत्रणा आणि विविध मानवी शरीराच्या प्रतिमांचे अचूक विश्‍लेषण करून एआय हे रेडिओलॉजिस्टसाठी अत्यंत उपयोगाचे ठरते.

आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा 'डीपटेक'तर्फे प्रभावी वापर

कुठल्याही हॉस्पिटलमध्ये एक्स-रे हा निदानाच्या पहिल्या टप्प्यांपैकी एक असतो आणि यामध्ये डीपटकचे एआय सोल्युशन हे रेडिओलॉजिस्टसाठी उपयुक्त व पूरक ठरते. डीपटेक एआय सोल्युशनमध्ये क्लाऊड आधारित सॉफ्टवेअरचा समावेश असतो जे हॉस्पिटलच्या कॉम्प्युटरवर इंस्टॉल केले जाते. हा कॉम्प्युटर सीटी स्कॅन किंवा एमआरआय मशिनशी जोडला जातो. स्कॅन घेतल्यानंतर ती प्रतिमा क्लाऊडवर जाते आणि एआयमधील घटक ती प्रतिमा साधारण आहे का असाधारण आहे हे ओळखतात. त्याआधारे एका अद्ययावत फॉरमॅटमध्ये संरचित अहवाल प्राप्त होतो. रेडिओलॉजिस्ट कुठूनही लॉग इन होऊ शकतात. रेडिओलॉजिस्ट स्वत: ती प्रतिमा पाहतात आणि अहवाल ठीक आहे की नाही ते पाहू शकतात. जर अहवालामध्ये त्यांना काही तफावत जाणवली तर ते त्यामध्ये बदल करून कॉम्प्युटरला सबमिट करू शकतात. या सोल्युशनमुळे अहवाल येण्याचा वेळ कमी होतो,अहवालाची गुणवत्ता सुधारते आणि एकंदरच यावरील खर्च कमी होऊ शकतो. नुकतेच डीपटेकने ग्रेटर चेन्नई कॉर्पोरेशनशी भागीदारी केली असून याद्वारे डिजिटल चेस्ट एक्सरेजमधून शरीराचे निदान करण्यासाठी एआय आधारित सोल्युशन पुरविले जात आहे. याद्वारे आजवर एक लाखहून अधिक लोकांची तपासणी झाली आहे. डीपटेकचे एआय सोल्युशन्स हे आता १२० हुन अधिक हॉस्पिटल्स मध्ये वापरले जातात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.