या गुंतवणुकीनंतर चीन सरकारचे कंपनीवर नियंत्रण असेल.
- शिल्पा गुजर
अॅपद्वारे कॅब सेवा पुरवणाऱ्या दीदी ग्लोबलवर (DiDi Global) लवकरच चीन सरकारचे नियंत्रण असू शकते. बीजिंग नगरपालिका सरकारने दीदी ग्लोबलमध्ये भाग घेण्यासाठी मोठ्या गुंतवणुकीचा प्रस्ताव (Investment Proposal) दिला आहे. या गुंतवणुकीनंतर चीन सरकारचे कंपनीवर नियंत्रण असेल.
शौकी ग्रुप (Shouqi Group) सरकार नियंत्रित कंपन्यांसह इतर काही कंपन्यांना सोबत घेऊन कन्सोर्टियमद्वारे दीदी ग्लोबलमध्ये (DiDi Global) गुंतवणूक करत असल्याची माहिती एका अहवालातून मिळत आहे. कन्सोर्टियमकडे कंपनीमध्ये बहुसंख्य हिस्सा तसेच व्हेटो पॉवर आणि संचालक मंडळावर एक जागा असेल.
बीजिंग टुरिझम ग्रुप कंपन्यांपैकी एक, शौकी ग्रुपने काही वर्षांपूर्वी आपले राईड शेअरिंग अॅप लाँच केले. यात वापरकर्त्यांची संख्या मोठी आहे. बीजिंग टुरिझम ग्रुप त्याच्या सहाय्यकांद्वारे ट्रॅव्हल एजन्सी, मॉल्स, रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स चालवते. हे अधिग्रहण (takeover)चीनची तंत्रज्ञान कंपनी (ByteDance) बाइटडान्सवर नियंत्रण ठेवण्याच्या चीन सरकारच्या प्रयत्नासारखेच असेल. बाइटडान्सचे व्हिडीओ अॅप टिकटॉक (Tiktok) अनेक देशांमध्ये लोकप्रिय आहे.
दीदी ग्लोबलने (DiDi Global) अमेरिकेत आयपीओमधून 4.4 अब्ज डॉलर्स उभारले. अमेरिका आणि चीनमधील वाढत्या तणावामुळे कंपनीत अडचणी सुरू झाल्या. याचे मूल्य (Valuation) अजूनही 70 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे.
कंपनीची चूक काय?
जूनमध्ये दीदी ग्लोबलचा (DiDi Global) चीन सरकारशी वाद सुरु झाला. दीदी ग्लोबलची (DiDi Global) अमेरिकेत लिस्टिंग करण्याचा निर्णय चीन सरकारच्या विरोधात होता.
अमेरिका कंपनीची लिस्टिंग झाल्यानंतर चीनमधील कम्युनिस्ट सरकार नाराज झाले आणि विरोध असताना लिस्टिंग केल्याने चीनला कंपनीने थेट आव्हान दिल्यासारखे वाटले. यामुळे कंपनीबद्दल सरकारची नाराजी वाढली आणि त्यामुळेच दीदी ग्लोबलवर (DiDi Global) नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.