डिझेल प्रतिलीटर 25 रुपयांनी महागलं; कुणाला बसणार दरवाढीचा फटका?

सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या बस, ट्रेन, उद्योग, विमानतळ आणि मॉल्स यासारख्या मोठ्या वापरकर्त्यांसाठी डिझेलच्या दरात रविवारी 25 रुपयांनी वाढ करण्यात आली.
Petrol Diesel Price Updates
Petrol Diesel Price Updatessakal media
Updated on

Petrol-Diesel Price Updates: युक्रेन-रशिया युद्ध सुरु झाल्यापासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे भारतातही पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार असल्याचा अंदाज तज्ञांनी वर्तवला होता. आता डिझेलच्या दरात प्रतिलीटर 25 रुपयांपर्यंतची वाढ झाली आहे. परंतु हा वाढ मोठ्या प्रमाणात पेट्रोल खरेदी करणाऱ्या वापरकर्त्यांसाठी असणार आहे.

सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या बस, ट्रेन, उद्योग, विमानतळ आणि मॉल्स यासारख्या मोठ्या वापरकर्त्यांसाठी डिझेलच्या दरात रविवारी 25 रुपयांनी वाढ करण्यात आली. यामुळे अशा वापरकर्त्यांच्या परिचालन खर्चात 27% वाढ झाली आहे, असे तेल विपणन कंपन्यांच्या सूत्रांनी सांगितले. रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक कच्च्या तेलाच्या दरात नुकत्याच झालेल्या वाढीचा परिणाम आहे. (Diesel Price increased upto Rs 25 per litre for bulk users)

Petrol Diesel Price Updates
Petrol-Diesel Price: घाऊक बाजारात डिझेल महागलं; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर आजचे दर

मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांसाठी डिझेलचा दर (Diesel Price) मात्र सलग १३६व्या दिवशी ९४.१४ रुपये प्रति लिटरवर कायम आहे, तर पेट्रोलचा दरही १०९.९८ रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे.

दरम्यान डिझेल दरवाढीचा फटका मुंबईत बससेवा देणाऱ्या बेस्ट (BEST) आणि महाराष्ट्रभर बस चालवणाऱ्या एसटी महामंडळाला (MSRTC) बसू शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या संस्था एकतर दरवाढीचा भार सहन करू शकू शकतात किंवा मग डिझेल भरण्यासाठी काही बस खासगी रिटेल पंपांवर पाठवतील. बेस्ट, एमएसआरटीसीचा सध्या बस भाढेवाढ करण्याचा विचार नाही, असंही सूत्रांनी सांगितले.

डिझेल दरवाढीचा रेल्वेला फटका-

सार्वजनिक वाहतूक बसेसव्यतिरिक्त, रेल्वेलाही काही प्रमाणात भाडेवाढीचा फटका बसणार आहे. कारण रेल्वेमध्ये डिझेल इंजिनचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, 2021-22 मध्ये, इलेक्ट्रीक डिझेल खर्चात 88 कोटी रुपयांची मोठी बचत झाली आहे.

Petrol Diesel Price Updates
Petrol-Diesel Price: कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण, जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर

अनेक उद्योग होणार प्रभावित-

मोठ्या प्रमाणात डिझेल वापरणारे उद्योग प्रभावित होणार आहेत, कारण त्यांच्या इनपुट खर्चात वाढ झाल्यामुळे वस्तूंच्या उत्पादन किंमती वाढू शकतात. मॉल्स आणि विमानतळांना या वाढीचा फटका बसणार आहे कारण ते बॅकअप वीज निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात डिझेल वापरतात, असे सूत्रांनी सांगितले.

बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र म्हणाले की, बेस्टच्या खर्चात 27 टक्क्यांनी वाढ होणार असल्याने परिवहन उपक्रमावर त्याचा भार पडणार आहे. आम्ही टप्प्याटप्प्याने डिझेल वाहने बंद करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि कमी खर्चिक असलेल्या बस चालवण्यावर आमचा भर आहे" असं ते म्हणाले. बेस्टकडे डिझेलवर चालणाऱ्या १८५ सिंगल डेकर बस आणि ४५ डबलडेकर बस आहेत. आठवड्याच्या शेवटी डिझेलवरच्या कमी बसेस चालवण्याचा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी सांगितले.

एसटी महामंडळाच्या (MSRTC) च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की त्यांच्या 18,000 पेक्षा जास्त बसेसचा ताफा डिझेलवर चालतो, परंतु भविष्यात ऑपरेशनल खर्च कमी करण्यासाठी CNG आणि इलेक्ट्रिक बसेसवर स्विच करण्याची योजना आहे. आम्ही कोणत्याही भाड्यात वाढ करणार नाही आणि आमचा खर्च कमी करण्यासाठी आम्ही शक्य तितक्या बसेस किरकोळ डिझेल पंपांवर पाठवणार आहोत जिथे इंधन स्वस्त आहे.

डिझेलवर चालणार्‍या बेस्ट बससाठी, प्रति किमी खर्च 40 रुपये आहे, जो आता सुमारे 50 रुपये होईल. तर सीएनजी बससाठी प्रति किमी 26 रुपये आहे आणि इलेक्ट्रिक बससाठी नऊ रुपये प्रति किमी इतका खर्च आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.