Digital Rupee : आजपासून डिजिटल रुपया लाँच; सामान्यांना करता येणार खरेदी, कसं ते जाणून घ्या

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने आजपासून डिजिटल रुपी (ई-रुपी) लाँच केले आहे.
Digital Rupee
Digital Rupeesakal
Updated on

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने आजपासून डिजिटल रुपी (ई-रुपी) लाँच केले आहे. मध्यवर्ती बँकेने दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीच्या टप्प्यात मुंबई, दिल्ली, बेंगळुरू आणि भुवनेश्वरमधील लोक ई-रुपीचा वापर करू शकतील. आरबीआयने नुकतेच एका पायलट प्रोजेक्टवर ई-रुपी सुरू केले आहे. यासाठी एसबीआय, आयसीआयसीआय, येस बँक आणि आयडीएफसी फर्स्ट बँक यांची निवड करण्यात आली आहे. लवकरच देशातील इतर राज्यांमध्ये सर्वसामान्यांसाठी ई-रुपी सुरू होईल अशी शक्यता आहे. आपण सध्या वापरत असलेल्या रुपयापेक्षा डिजिटल रुपया कसा वेगळा आहे? आणि तुम्ही त्याद्वारे कशी खरेदी करू शकाल? हे जाणून घेऊयात.

हेही वाचा : आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे...

अशा प्रकारे तुम्ही डिजिटल रुपी वापरू शकता :

१) डिजिटल-रुपी डिजिटल टोकन स्वरूपात उपलब्ध असेल. तुम्हाला 10, 20, 50 पर्यंतच्या विविध मूल्यांचे डिजिटल रुपये मिळतील. त्याचे वितरण बँकांमार्फत केले जाईल. सध्या चलनात असलेली नाणी आणि नोटा यांच्या मूल्यांएवढीच किंमत डिजिटल रुपीची असणार आहे.

२) डिजिटल वॉलेटमध्ये डिजिटल रुपये असतील. बँका तुम्हाला ई-रुपी साठी डिजिटल वॉलेटची सुविधा देतील. लोक त्यांच्या मोबाईल फोनवर डिजिटल वॉलेटद्वारे ई-रुपी खरेदी करू शकतील.

३) डिजिटल-रुपी व्यवहार व्यक्ती ते व्यक्ती (P2P) असतील. म्हणजेच, तुम्ही एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीसोबत व्यवहार करू शकाल. त्याच वेळी, क्यूआर कोड वापरूनही तुम्ही व्यापाऱ्यांना/ दुकानदारांना पैसे देऊ शकाल.

४) डिजिटल-रुपये रोख पैशांप्रमाणेच सुविधा देतील. म्हणजेच डिजिटल रुपया पूर्णपणे सुरक्षित असेल. जसा नोटांचा वापर होत आहे तसाच वापर डिजिटल रुपीचा होतो.

५) रोखीच्या विपरीत, तुम्हाला यावर बँकेकडून कोणतेही व्याज मिळणार नाही. हे इतर प्रकारच्या पैशांमध्ये रूपांतरित केले जाऊ शकते म्हणजे सोने खरेदी किंवा इतर कोणत्याही ठेवी.

Digital Rupee
Digital Rupee : क्रिप्टोकरन्सी आणि डिजिटल रुपयामध्ये काय फरक आहे?

डिजिटल रुपयाची प्रमुख वैशिष्ट्ये :

  • डिजिटल रुपया हे एक सार्वभौम चलन आहे जे मध्यवर्ती बँकेने तिच्या आर्थिक धोरणानुसार जारी केले आहे.

  • डिजिटल रुपीद्वारे केले जाणारे सर्व व्यवहार व्यक्ती, व्यवसाय आणि सरकारी संस्थांसाठी वैध असतील.

  • Central Bank Digital Currency (CBDC) व्यावसायिक बँकांकडून रोख आणि पैशांमध्ये परिवर्तनीय आहे.

  • CBDC च्या धारकांना बँक खाते असण्याची गरज नाही. कारण ते कायदेशीर चलन आहे.

Digital Rupee
ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्ट ऑफीसची दमदार स्कीम; 2.21 लाख रुपयां पर्यंत मिळेल व्याज

डिजिटल रुपया म्हणजे काय?

रुपी ही पूर्णपणे सरकार नियंत्रित कायदेशीर चलन आहे. यामध्ये आरबीआय नियामक म्हणून असेल आणि इतर बँका व्यवहारात मदत करण्यासाठी आरबीआय सोबत असतील. व्यवहारांमध्ये कोणतीही अडचण आल्यास वित्तीय संस्था हस्तक्षेप करू शकतात. रोख चलनाप्रमाणेच डिजिटल रुपीचा वापर केलाजाईल. याशिवाय यामध्ये डिजिटल चलनाचे रोख स्वरुपात  रूपांतर करता येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.