डिजिटल व्यवहार करताना...

बँकेतून बोलत असल्याचे सांगून कोणी आपली माहिती
Digital Transactions
Digital Transactions sakal
Updated on

आपल्या मेसेज अथवा मेलवर पेमेंट लिंक आल्यास अशी लिंक खरी असल्याबाबतची खात्री करुन घ्या, त्यासाठी पुढे दिलेली लिंक आपल्या ब्राउझरमध्ये टाईप केल्यास आपल्या ब्राउझरवर संपूर्ण युआरएल दिसेल ज्यामुळे आलेल्या लिंकची सत्यता पडताळून पाहता येईल उदा: pmcares.gov.in या लिंक पाठविण्याऐवजी pmcare.gov.in ही लिंक आपल्याला आली असेल आणि आपण या लिंकवर क्लीक करून पेमेंट केले असेल तर तर पीएम केअर फंडाला न जाता कुणी तरी आपल्याला फसविले आहे. दोन लिंकमधील शेवटचे ‘एस’ (S) या अक्षर नसणे हे सकृतदर्शनी लक्षात येत नाही आणि यातून आपली फसवणूक होते, त्याऐवजी आपल्याला आलेली लिंक आपल्या ब्राउझरमध्ये टाईप केल्याने आपल्या ब्राउझरवर संपूर्ण युआरएल दिसेल व आपल्याला आलेली लिंक ही फसवी असल्याचे दिसून येईल

बँकेतून बोलत असल्याचे सांगून कोणी आपली माहिती जसे की नाव, आधार नंबर, पॅन कार्ड, मेल आयडी, क्रेडिट, डेबिट/कार्डनंबर यासारखी माहिती आपले खाते अथवा कार्ड ब्लॉक होऊ नये यासाठी मागत असेल तर अशा व्यक्तीस आपली माहिती अजिबात देऊ नका. बँकेस फोन करून अथवा समक्ष जाऊन या बाबत खात्री करून घ्या .

एखाद्या जवळच्या मित्राने/नातेवाईकाने मी खूप अडचणीत आहे व मला लगेचच रक्कम गुगल पे/भीमवर ट्रान्सफर कर, असे फोनवर सांगितले तर अशा वेळी त्वरित रक्कम ट्रान्सफर न करता आपला मित्र/नातेवाईक बोलत असल्याची खात्री करून घ्या आणि मगच रक्कम ट्रान्सफर करा.

सोशल मीडियावर आपली सगळी माहिती ठेऊ नका. शक्यतो आपले प्रोफाईल लॉक करू ठेवा, तसेच आपण कामानिमित्त अथवा ट्रीपसाठी बाहेर गावी गेला असाल तर आपले फोटो वेळोवेळी अपलोड करू नका. आपले फोटो मॉर्फ करून डुप्लीकेट आधार कार्ड, पॅन कार्ड तयार करून आपले बँक खाते हॅक केले जाऊ शकते.

आपले विजेचे बील भरलेले नाही किंवा कंपनीकडे जमा झालेले नाही. आपला वीज पुरवठा खंडीत होऊ द्यायचा नसेल किंवा आपले क्रेडिट/डेबिट कार्ड ब्लॉक होऊ द्यायचे नसेल तर माहिती मागितली जाते व केवळ भीतीपोटी आपण ही माहिती अनवधानाने दिली तर आपल्या बँक खात्यातून परस्पर रक्कम काढली जाते. हे टाळण्यासाठी कोणासही आपली माहिती फोन/मेलवर देऊ नये. यासाठी सबंधित कार्यालयाशी संपर्क करून खात्री करून घ्यावी.

एखाद्याशी फेसबुक/व्हॉटस्अॅप/इन्स्टाग्राम यासारख्या सोशल मीडियावर ओळख झालेली व्यक्ती आपल्याला भेटण्याचे निमंत्रण देत असेल तर या व्यक्तीची माहिती मिळवावी. भेटायला जाताना सोबत एखाद्या मित्राला घेऊन जावे. शक्यतो अनोळखी ठिकाणी जाऊ नये.

क्यूआर कोडचा वापर हा एखाद्याला पेमेंट करण्यासाठी करावयाचा असतो आणि पेमेंट घेण्यासाठी कधीही क्यू आर कोडस्कॅन करू नये. असा फ्रॉड हा खरेदीदाराकडून पेमेंट करत असल्याचे भासवून केला जातो.

आपले पासवर्ड व पिन नंबर शक्यतो आपल्या लक्षात राहतील असे, पण इतरांना कळणार नाहीत अशा पद्धतीने करावेत व सर्वसाधारणपणे ९० दिवसांच्या कालावधीने बदलावेत.पासवर्ड करताना त्यात आपले नाव, मुलांची, पत्नीचे नाव, आपल्या गाडीचे नाव, घराचे, सोसायटीचे नाव यांचा समावेश टाळावा, पिननंबर तयार करताना आपली, मुलांची जन्म तारीख, गाडीचा नंबर असा पिननंबर असू नये. बऱ्याचदा असे पासवर्ड, पिननंबर मोबाईलमध्ये सहज मिळावेत म्हणून स्टोअर केले जातात, असे करताना ते संक्षिप्तपणे करावेत जेणेकरून आपल्यालाच कळतील अन्य कोणास समजणार नाही. उदा : आपण ९२ ते ९६ या वर्षात एसपी कॉलेजमध्ये असाल व आपण आपला पासवर्ड spcollege#९२९६ असा केला असेल तर नोटपॅडमध्ये तो cl#२६ असा केल्यास केवळ आपल्याला समजू शकेल.

डिजिटल व्यवहारांत आपली फसवणूक झाली तर त्वरित नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर ऑनलाइन तक्रार दाखल करा. हे पोर्टल केवळ या प्रकारच्या तक्रारींची दखल घेण्यासाठीच सुरू केले असून, ते केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत आहे. थोडक्यात असे म्हणता येईल, की या डिजिटल युगात डिजिटल व्यवहार करणे निश्चितच गरजेचे व सोयीचे आहे; मात्र यातून आपली होणारी फसवणूक टाळणे तितकेच आवश्यक आहे. योग्य ती खबरदारी घेतल्यास अशी फसवणूक निश्चितच टाळता येईल.

(लेखक सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर-सीएफपी आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.