Muhurat Trading : आज 'हे' पाच स्टॉक खरेदी केल्यास मिळू शकतात दुप्पट रिटर्न

दिवाळीच्या दिवशी शेअर मार्केट मध्ये आज कोणत्या स्टॉकमध्ये गुंतवणुक करायची हा एक मोठा प्रश्न असतो.
Share Market
Share Marketesakal
Updated on

दिवाळीच्या दिवशी शेअर मार्केट मध्ये आज कोणत्या स्टॉकमध्ये गुंतवणुक करायची हा एक मोठा प्रश्न असतो. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर मुहूर्त ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करायची असेल तर, येथे जाणून घ्या कोणत्या स्टॉकमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला मिळू शकतात दुप्पट रिटर्न.

1- फेडरल बँक - चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत फेडरल बँकेने चांगली कामगिरी केली आहे. तज्ञांच्या मते येत्या दिवाळीला कंपनीच्या शेअरची किंमत 230 रुपयांपर्यंत जाऊ शकते. त्यामुळे या कंपनीत गुंतवणुक केल्यास तुम्हाला दुप्पट परतावा मिळू शकतो.

२- रेणुका शुगर- घसरत चालेल्या रुपयामुळे साखर कंपन्यांच्या नफ्यात वाढ झाली आहे. त्यापैकी रेणुका शुगरची स्थिती बरी असल्याचे दिसून येत आहे. मुहूर्त ट्रेडिंगमध्ये या शेअरमध्ये गुंतवणुक केल्यास गुंतवणूकदार पुढच्या वर्षी दिवाळीपर्यंत श्रीमंत होऊ शकतात. तज्ञांचा अंदाज आहे की, कंपनीच्या शेअरची किंमत 120 रुपयांपर्यंत जाऊ शकते.

Share Market
Muhurat Trading: मुहूर्त ट्रेडिंगसाठी तयार आहात ना? जाणून घ्या कोणते शेअर्स करतील मालामाल?

3- कोल इंडिया लिमिटेड: तज्ञांच्या मते कोल इंडिया ही PSU स्टॉकमध्ये लाभांश देण्यासोबतच कंपनीवर कोणतेही कर्ज नाही. कंपनीच्या शेअरची किंमत सध्याच्या 238 रुपयांवरून 500 रुपयांपर्यंत जाऊ शकते.

4- डीएलएफ (DLF) - कोविड-19 नंतर पुन्हा एकदा रिअल इस्टेटच्या परिस्थितीत बरीच सुधारणा झाली आहे. अशा स्थितीत कंपनीचे शेअर्स झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. तज्ञांच्या मते, स्टॉकची टार्गेट किंमत 600 रुपये आहे.

Share Market
Bank job : एसबीआयमध्ये पदवीधरांना नोकरीची संधी; दीड हजार जागांवर भरती

5- इंडियन हॉटेल कंपनी- कोविडनंतर पुन्हा एकदा हॉटेल उद्योगाची स्थिती सुधारत आहे. या समभागाचा कल चार्ट पॅटर्नवरही सकारात्मक दिसत आहे. तज्ञांच्या मते, कंपनीच्या शेअरची किंमत येत्या एका वर्षात 255 रुपयांपासून 500 रुपयांच्या पातळीवर जाऊ शकते.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.