अटल पेन्शन योजना (APY) ही भारतातील नागरिकांसाठी विशेष पेन्शन योजना आहे, या योजनेमुळे ६० वर्षांवरील नागरीकांना दरमहा पेन्शनची हमी मिळते. प्रत्येकाला म्हातारपणाची चिंता असते. तुमची सेवानिवृत्ती सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही सरकारच्या अटल पेन्शन योजनेत (APY) पैसे गुंतवू शकता.
या योजनेंतर्गत पती-पत्नी स्वतंत्र खाते उघडून दरमहा 10,000 रुपये पेन्शन मिळवू शकतात. त्यामुळे या योजनेअंतर्गत प्रत्येकाने खाते उघडावे. यासाठी काय प्रक्रिया आहे आणि या योजनेसंदर्भात अधिक माहिती जाणून घ्या. (Do you know about Atal Pension Yojana will give you 10000 rs pension after 60 years of your age
या योजनेत कोण गुंतवणूक करू शकतात?
अटल पेन्शन योजना 2015 मध्ये सुरू करण्यात आली. त्यावेळी हे असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी सुरू करण्यात आले होती परंतु आता 18 ते 40 वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतो आणि पेन्शन योजनेचा लाभ घेऊ शकतो. ज्यांचे बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खाते आहे ते त्यात सहज गुंतवणूक करू शकतात. या योजनेत गुंतवणूकदारांना ६० वर्षांनंतर पेन्शन मिळू लागते.
अटल पेन्शन योजना काय आहे?
अटल पेन्शन योजना ही अशी सरकारी योजना आहे ज्यामध्ये तुम्ही केलेली गुंतवणूक तुमच्या वयावर अवलंबून असते. या योजनेअंतर्गत,ही एक सुरक्षित गुंतवणूक आहे ज्यामध्ये तुम्हाला नोंदणी करायची असेल तर तुमच्याकडे बचत खाते, आधार क्रमांक आणि मोबाइल नंबर असणे आवश्यक आहे
या योजनेचे काय फायदे आहेत
या योजनेअंतर्गत 18 ते 40 वर्षे वयोगटातील लोक अटल पेन्शन योजनेत त्यांचे नामांकन मिळवू शकतात. यासाठी अर्जदाराचे बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते असणे आवश्यक आहे. या योजनेत तुम्ही जितक्या लवकर गुंतवणूक कराल तितका जास्त फायदा तुम्हाला मिळेल.
10,000 रुपये पेन्शन कसे मिळवायचे
39 वर्षांपेक्षा कमी वयाचे पती/पत्नी स्वतंत्रपणे या योजनेचा लाभ घेऊ शकतात, ज्यातून त्यांना 60 वर्षांनंतर दरमहा 10,000 रुपये संयुक्त पेन्शन मिळेल. जर पती आणि पत्नी ज्यांचे वय ३० वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असेल, तर ते त्यांच्या संबंधित अटल पेन्शन योजना खात्यांमध्ये दरमहा ५७७ रुपये योगदान देऊ शकतात. जर पती-पत्नीचे वय 35 वर्षे असेल, तर त्यांना त्यांच्या एपीवाय खात्यात दरमहा 902 रुपये जमा करावे लागतील. मासिक पेन्शन व्यतिरिक्त, जोडीदारापैकी एकाचा मृत्यू झाल्यास, दुसऱ्या जोडीदाराला प्रत्येक महिन्याला 8.5 लाख रुपये आणि सोबतच संपूर्ण आयुष्य पेन्शन मिळेल.
कर लाभ
अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना आयकर कायदा 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतचा कर लाभही मिळतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.