Dr Reddy च्या शेअर्समध्ये येत्या काळात 30% वाढ अपेक्षित...

या शेअर्समध्ये पैसे गुंतवल्यास, 30 टक्क्यांपर्यंत वाढ दिसू शकते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
Dr Reddy shares price increased
Dr Reddy shares price increased
Updated on

शेअर बाजारात सतत चढ - उतार दिसून येत आहेत अशात गुंतवणूकदारांनी कोणत्या शेअरमध्ये पैसे गुंतवले तर त्यांना येत्या काळात चांगला परतावा मिळू शकतो, तर त्यासाठी तुम्हाला तज्ज्ञ किंवा ब्रोकरेज हाऊसेस मदत करतील. नुकताच ब्रोकरेजने डॉ रेड्डी (Dr Reddy) या फार्मा क्षेत्रातील दिग्गज कंपनीचा विचार करण्याचा सल्ला दिला आहे. या शेअर्समध्ये पैसे गुंतवल्यास, 30 टक्क्यांपर्यंत वाढ दिसू शकते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

ब्रोकरेज कंपनी CLSA ने या स्टॉकवर बाय रेटींग (Buy Rating) कायम ठेवले आहे आणि 4950 रुपयांचे टारगेट दिले आहे. कंपनीने उत्तर अमेरिका आणि भारतातील लॉन्ग-टर्म ग्रोथ ड्रायव्हरबाबत अधिक माहिती दिली.

Dr Reddy shares price increased
Share Market वधारला, Sensex अन् Nifty तेजीसह बंद

याशिवाय ब्रोकरेज कंपनी मॉर्गन स्टॅनलीने ओव्हरवेटचे रेटिंग कायम ठेवले आहे. कंपनीने 5099 रुपयांचे टारगेट दिले आहे. डबल डिजिट ग्रोथ सेल्स यापुढेही सुरू राहण्याची आशा त्यांनी व्यक्त केली.

ब्रोकरेज कंपनी जेफरीजने या स्टॉकवरील बाय रेटींग (Buy Rating) कायम ठेवले आहे आणि 5036 रुपयांचे टारगेट दिले आहे. त्याच वेळी, ब्रोकरेज कंपनी नोमुरानेही या स्टॉकमधील बाय रेटींग (Buy Rating) कायम ठेवले आहे आणि 5552 रुपयांचे टारगेट दिले आहे.

Dr Reddy shares price increased
Gold-silver price: सोनं महागले, चांदी स्वस्त; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

कंपनीचे तिमाही निकाल ?

या तिमाहीत कंपनीच्या कंसोलिडेटेड पीएटीमध्ये 76 टक्क्यांनी घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या मार्च तिमाहीच्या तुलनेत या वर्षाच्या मार्च तिमाहीत कंपनीने 87.5 कोटी रुपयांचा नफा सादर केला होता. मात्र, कंपनीच्या महसुलात 15 टक्के वाढ झाली आहे. या तिमाहीत कंपनीने 5,436.8 कोटी रुपयांचा महसूल सादर केला आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Dr Reddy shares price increased
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! सरकार देणार ४२ हजार रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.