रमेश आणि सुरेश हे दोघे जिवलग मित्र होते. कोणताही आर्थिक निर्णय ते चर्चा करूनच घेत. सोन्यातील गुंतवणूक हा या दोघांचा अतिशय आवडीचा विषय!
भारतीय परंपरेनुसार सोने(gold) खरेदी करणे, हे समृद्धी आणि मांगल्याचे प्रतीक आहे, असे या दोघांचे ठाम मत होते. सोन्यातील गुंतवणूक संकटांच्या काळात सुरक्षित मानली जाते, तसेच महागाईविरुद्ध लढण्यासाठी सोन्यातील गुंतवणूक(Gold investment) उपयोगी पडते. शेअर बाजारात (Share market) अस्थिरता असते, तेव्हा गुंतवणूकदाराच्या पोर्टफोलिओला सोने स्थिरता देते, हेदेखील त्यांनी ऐकले होते. मात्र, प्रत्यक्ष सोने खरेदी करण्याऐवजी गोल्ड म्युच्युअल फंडात(gold mutual fund) गुंतवणूक करावी, असा त्यांचा विचार होता.
उदाहरण द्यायचे झाले, तर सप्टेंबर २०११ मध्ये ‘एसबीआय गोल्ड म्युच्युअल फंड’ ही योजना बाजारात आली. सुरुवातीला या फंडाचे युनिट्स १० रुपये प्रति युनिट या बाजारभावाने मिळत होते.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
दोन्ही मित्रांनी या फंडात गुंतवणूक करायचे ठरवले. दहा रुपये प्रति युनिट हा दर स्वस्त आहे, असे समजून रमेशने एकरकमी १० लाख रुपये गुंतवले. मात्र, सुरेशकडे एवढे पैसे एकरकमी नसल्याने त्याने दरमहा १० हजार रुपये याप्रमाणे पुढील १०० महिन्यांसाठी ‘एसआयपी’च्या पद्धतीने गुंतवणूक सुरू केली. जानेवारी २०२० पर्यंत गुंतवणूक सुरू ठेवून एकूण १० लाख रुपये गुंतवले.
हे दोघे मित्र नुकतेच भेटले
तेव्हा चर्चेतून पुढील मुद्दे दोघांच्या लक्षात आले
रमेशने या फंडात अगदी सुरुवातीला १० लाख रुपयांची गुंतवणूक केली, तर सुरेशने दहा वर्षांसाठी दरमहा १० हजार रुपयांची ‘एसआयपी’ केली. मात्र, दोघांनी गुंतविलेल्या १० लाख रुपयांचे सध्याचे बाजारमूल्य साधारणतः एकसारखेच म्हणजे पंधरा लाख रुपयांच्या आसपास आहे.
रमेशने एकदम १० लाख रुपये गुंतविल्याने त्याला इतर गुंतवणूक पर्यायात गुंतवणूक करणे शक्य झाले नाही. या उलट सुरेशने दरमहा १० हजार रुपये गुंतविल्याने त्याची आर्थिक ओढाताण झाली नाही आणि त्याला इतर गुंतवणूक पर्याय उपलब्ध राहिले.
दहा रुपये प्रतियुनिट हा सुरुवातीचा बाजारभाव रमेशला त्यावेळी स्वस्त वाटला होता. मात्र, त्यानंतर त्या फंडाचा बाजारभाव (एनएव्ही) अनेकदा दहा रुपयांपेक्षाही कमी झाला होता.
रमेशने १० लाख रुपये एकदम न गुंतवता ती रक्कम बँकेतील बचत खात्यावर ठेवून त्यातून या फंडात ‘एसआयपी’ केली असती, तर बचत खात्यातील रकमेवर व्याजदेखील मिळाले असते.
गुंतवणुकीच्या या अनुभवातून या दोन मित्रांनी निष्कर्ष काढला, की कोणताही नवा म्युच्युअल फंड बाजारात आल्यानंतर आर्थिक ओढाताण करून त्यात एकरकमी मोठी गुंतवणूक करण्याची गडबड न करता नियमितपणे गुंतवणूक करण्यावर भर देणे महत्त्वाचे असते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.