DreamFolks IPO : ड्रीमफोक्सचा आयपीओ आजपासून विक्रीसाठी खुला

ड्रीमफोक्स सर्व्हिसेसचा आयपीओ अर्थात प्राथमिक समभाग विक्री योजना, उद्यापासून २४ ऑगस्ट रोजी विक्रीसाठी खुला होत असून २६ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार
dreamfolks services limited ipo share market details business mumbai
dreamfolks services limited ipo share market details business mumbaisakal
Updated on

मुंबई : ड्रीमफोक्स सर्व्हिसेसचा आयपीओ अर्थात प्राथमिक समभाग विक्री योजना, उद्यापासून २४ ऑगस्ट रोजी विक्रीसाठी खुला होत असून २६ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहेत.
अँकर गुंतवणूकदारांसाठी तो २३ ऑगस्ट रोजी एक दिवसासाठी खुला होईल. ऑगस्टमध्ये दाखल होणारा हा दुसरा आयपीओ आहे. एक सप्टेंबरपर्यंत शेअर वाटप निश्चित केले जाईल. त्यानंतर पात्र गुंतवणूकदारांना पाच सप्टेंबरपर्यंत शेअर मिळतील. सहा सप्टेंबर रोजी कंपनी मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारात पदार्पण करेल.

कंपनीने याचा किंमत पट्टा ३०८ रुपये ते ३२६ रुपये प्रति शेअर असा निश्चित केला आहे. १.७२ कोटी पेक्षा जास्त शेअर विक्रीसाठी उपलब्ध होणार असून कंपनीचे प्रवर्तक मुकेश यादव आणि दिनेश नागपाल प्रत्येकी ६५.३१ लाख शेअर तर लिबरथा पीटर कल्लाट ४१.७९ लाख शेअर विक्रीसाठी काढणार आहेत. शेअरच्या कमाल किंमतीनुसार कंपनीला ५६२ कोटी रुपये मिळतील. गुंतवणूकदार किमान ४६ शेअरसाठी आणि त्यानंतर ४६च्या पटीत बोली लावू शकतात. त्यामुळे, किरकोळ गुंतवणूकदारांना किमान १४,९९६ रुपये गुंतवावे लागतील. ड्रीमफोक्स सर्व्हिसेसने मार्च २०२२ ला संपलेल्या वर्षात १६.२५ कोटी नफा कमावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.